मुंबई | आपल्या व्यवस्थेतील गैरव्यवहार बाहेर काढण्याचा हेतूनं तत्कालिन भारत सरकारनं केंद्रीय तपास यंत्रणांचं जाळं उभा केलं. या तपास यंत्रणांच्या माध्यमातून देशभर कारवाया केल्या जातात.
सध्या मात्र केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर मोठ्या प्रणामात टीका टिप्पणी होताना दिसत आहे. केेंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकार विरोधकांना त्रास देण्याचं काम करत आहे, असा आरोप केला जात आहे.
केंद्रात एका पक्षाचं आणि राज्यात एका पक्षाचं असं दोन्हीकडं वेगवेगळी सत्तास्थानं निर्माण झाल्यानं हा गोंधळ अधिक प्रमाणात पहायला मिळत आहे. परिणामी सध्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये केंद्र सरकारविरूद्ध असंतोष वाढताना दिसत आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या कारवाईमुळं तुरूंगात आहेत. देशमुख यांच्याविरोधात अद्यापही चौकशी चालू आहे. त्यांच्याविरोधात तक्रार करणारे परमबीर सिंग यांना न्यायालयानं फरार घोषित केलं आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर संशयित गाडी प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यात अनेक धक्कादायक प्रकरणांचा खुलासा होत गेला.
राज्य पोलीस दलातील महासंचालक दर्जाचा पोलीस अधिकारी राज्याच्या गृहमंत्र्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करतो आणि नंतर गायब होतो हा प्रकार फक्त आपल्याचं राज्यात झाला, अशी चर्चा देशभर रंगली होती.
अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जहरी टीका केली आहे. अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई सुडबुद्धीनं केल्याच राऊत म्हणाले आहेत.
आम्ही जो त्रास भोगलाय त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कोणाला माफ करत नाही, असा इशारा संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 17 तारखेला नागपूरमध्ये केंद्र सरकारवर हल्ला करताना अनिल देशमुख यांच्यावर चुकीची कारवाई करत महाविकास आघाडीला त्रास देण्यात आल्याचं वक्तव्य केलं होतं.
दरम्यान, अनिल देशमुख सध्या तुरूंगात आहेत. त्यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंग हे मात्र फरार आहेत. तरीही अनिल देशमुख यांना तुरूंगात का टाकण्यात आलं हा सवाल महाविकास आघाडीचे नेते विचारत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिनेत्री प्रिती झिंटानं दिली गूड न्यूज! वयाच्या 46व्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई
भर सामन्यात चहर आणि गप्टीलची नजरेची खुन्नस, पाहा व्हायरल व्हिडीओ
“संजय राऊत यांना मी माझा पगार देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं”