राज्यसभेचे उमेदवार निश्चिती करण्यासाठी भाजपची आज बैठक

नवी दिल्ली | येत्या 26 मार्चला राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची आज बैठक पार पडणार आहे.

आधी भाजपकडून राज्यसभेवर भाजपचे नेते उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. भाजपला राज्यसभेवर 3 जागा निवडून जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून तिसऱ्या जागेवर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अशी चर्चा सुरु आहे. भाजपच्या कार्यकारीणीकडून एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा आग्रह केला जात आहे. दिल्लीच्या वर्तुळात एकनाथ खडसेंच्या नावाला मान्यता मिळेल की नाही याबाबत शंका आहे.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुलाच्या रिसेप्शनसाठी भाजपचे नेते दिल्लीला गेले होते. यादरम्यान राज्यसभेवर पाठवलेल्या जाणाऱ्या नेत्यांच्या यादीवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपमध्ये काय मिळणार?, हे पाच आहेत पर्याय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी औषध फवारणी

कोरोनाबाबत असहकार्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही- छगन भुजबळ

ज्योतिरादित्य शिंदे वेगळा पक्ष काढणार; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

कोरोनामुळं मुकेश अंबानींनी श्रीमंतांच्या यादीतील अव्वल स्थान गमावलं