सांगली | राज्यभर सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भोंग्याच्या भूमिकेमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा जोरदार रंगला आहे.
औरंगाबादमध्ये झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसैनिक कमालीचे आक्रमक झालेले पहायला मिळाले.
राज्य सरकार आणि मनसेमध्ये सध्या भोंग्याच्या मुद्द्यावरुन खडांजंगी सुरु आहे. त्यातच राज ठाकरेंच्या माध्यमातून भाजप सूडबुद्धीचं राजकारण करतेय, असा हल्लाबोल राज्य सरकारमधील नेत्यांकडून करण्यात येत आहे.
काही भाजप नेत्यांकडूनही राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलेलं पहायला मिळालं. अशातच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे.
राज ठाकरेंच्या मनसे बरोबर भाजपची युती करणं हे भाजपला परवडणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास, सबका विश्वास ही भूमिका मांडलीय, त्या भूमिकेला तडा जाऊ शकतो, असं मत आठवलेंनी व्यक्त केलं आहे.
मनसेला सोबत घेण्याचा भाजपने विचार करू नये. मी सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही, असंही आठवले म्हणाले आहेत.
महाराष्ट्र मध्ये भाजप आणि आरपीआय सोबत येत सत्ता आणूया आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची आमची भूमिका आहे
सांगलीमध्ये बोलताना आठवले यांनी राज ठाकरेंविषयी वक्तव्य केलेलं पहायला मिळालं. त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांनी भीमा कोरेगाव हिंसाप्रकरणी मांडलेल्य जबाबाशी सहमत नसल्याचंही म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या –
“राज ठाकरेंना भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच भोंग्याचा त्रास सुरू झाला”
भोंग्याच्या वादावर केंद्रीय मंत्र्याची राज ठाकरेंवर जोरदार टीका, म्हणाले…
मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर
रशियन सैनिकाच्या कृत्याने खळबळ; हादरवणारा प्रकार समोर
“मशिदीत पहाटेची अजान होणार नाही, पण साईबाबांची काकड आरती थांबवू नका”