“आजपासून भाजपच्या अध:पतनाला सुरुवात झालीये”

मुंबई | राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरू असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला इशारा दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये आज चारही जागेवर आमचे उमेदवार निवडून येतील. भाजपाकडून काही बातम्या पेरल्या जात आहेत की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वितुष्ट आहे. त्यात कोणतंही तथ्य नाही, असं मिटकरींनी सांगितलं.

तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी नव्या जोमाने हे उमेदवार उभे केले आहेत. ते निवडून येतील, असं अमोल मिटकरी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणालेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा (NCP) धक्का बसला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आली आहे.

न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर हायकोर्टही ठाम आहे.

नवाब मलिकांना मतदानाचा हक्क कोर्टानं नाकारला आहे. आता या याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ पोलीस बंदोबस्तात मतदान करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी मलिकांचे वकिल करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! 

एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्या गोटात खळबळ 

आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, आमचे चारही उमेदवार विजयी होतील- संजय राऊत 

MIM चा पाठिंबा कोणाला?; इम्तियाज जलील यांनी स्पष्ट सांगितलं 

“…तर आम्ही काही बांगड्या घातल्या नाहीत, बाकी काही पेटलं तरी चालेल”