लखनऊ | आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवरून उत्तर प्रदेशातील वातावरण चांगलचं तापलं आहे. काँग्रेस प्रभारी प्रियंका गांधी यांनी ‘लडकी हूं लड सकती हूं’ हा नारा दिला आहे.
प्रियंका गांधी महिलांसंदर्भात अनेक घोषणा करत आहेत. त्यातच काँग्रेस पक्षाकडून झाशी येथे आयोजित मॅरेथॉनमध्ये 10,000 हजारांपेक्षा अधिक मुली सहभागी झाल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
‘लडकी हूं लड सकती हूं’ या घोषणेसोबतच आता प्रियंका गांधी यांनी ‘लडकियां लडेंगी अपने हक के लिए, अपनी उडाण के लिए, बदलाव के लिए’, असंही म्हटलं आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विट टॅग करत प्रियंका गांधी यांनी तुम्ही मुलींवर नियंत्रण ठेवण्यासारखे महिलाविरोधी वक्तव्य केलं. त्यामुळेच आपण लखनऊमध्ये मुलींच्या मॅरेथॉनला परवानगी दिली नाही, असं म्हटलं आहे.
झाशीच्या मुलींनी तुम्हाला एक संदेश दिला आहे मुली आता सहन करणार नाहीत. त्या लढतील त्यांच्या हक्कासाठी, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच जर तुम्ही रॅली करू शकता तर मुलीही धावू शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे.
कोणत्याही सरकारी बसेस न लावता, सरकारी यंत्रणा नसताना अनेक मुली सहभागी झाल्या. आज उत्तर प्रदेशातील प्रत्येक मुलगी ‘लडकी हूं लड सकती हूं’ घोषणेसोबत जोडलेली आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
यावेळी प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बोचरी टीका केली आहे. योगी आदित्यनाथजी मुलींच्या प्रगतीविषयी आणि मुलींच्या आवाजाविषयी इतके विरोधी आहेत की, त्यांनी लखनऊमधील मॅरेथॉनची परवानगी रद्द केली, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून लखनऊ आणि झांशी येथे मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. ही मॅरेथॉन झाशी येथे पार पडली परंतु, लखनऊ येथे परवानगी नाकारण्यात आली. प्रशासनाने लखनऊमध्ये मॅरेथॉन होऊ दिली नाही, असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.
लखनऊ येेथे मॅरेथॉनला योगी सरकारकडून परवानगी न मिळाल्याने काँग्रेसने योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शनिवारी संध्याकाळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लखनऊ पोलिस आयुक्तांलयासमोर निदर्शनं केली होती.
रविवारी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गर्दी जमवून योगी सरकार लॅपटॉप आणि मोबईलचे वाटप करू शकतं. मात्र, मॅरेथॉन होऊ देत नाहीत. मुलींसोबत इतका अन्याय का ?, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
पाहा ट्विट-
..@myogiadityanath जी आप लड़कियों को नियंत्रित करने जैसी महिला विरोधी बात करते हो, इसलिए आपने लखनऊ में लड़कियों की मैराथन नहीं होने दी।
झांसी की लड़कियों ने आपको एक संदेश भेजा है कि लड़कियां सहेंगी नहीं, अपने हक के लिए लड़ेंगी। अगर आप रैली कर सकते हो, तो लड़कियां भी दौड़ेंगी। pic.twitter.com/5bBYT5eyXc
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 26, 2021
महत्त्वाच्या बातम्या-
“सनी लिओनीचा ‘तो’ व्हिडीओ 3 दिवसात हटवा”, गृहमंत्र्यांचा अल्टीमेटम
अभिमानास्पद! युवराज सिंगची ‘ती’ खास बॅट अंतराळात पोहोचली; पाहा व्हिडीओ
अजित पवार म्हणतात, “तो राज्यपालांचा अधिकार पण ज्या परंपरा…”
फुटबाॅलच्या मैदानात दुर्दैवी घटना; खेळाडू गोलकिपरला धडकला अन्…; पाहा व्हिडीओ
“वडिलांनी सांगितलंच होतं, आज काहीतरी वाईट होणार”, जग्गूदादाचा मोठा खुलासा