भाजपला मोठं खिंडार! भाजपच्या ‘या’ आमदाराच्या पत्नीसह दोन माजी आमदार खडसेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार

जळगाव | अलिकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत.  भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकला असून ते आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरानंतर भारतीय जनता पार्टीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खडसे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. नाथाभाऊंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे या देखील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तसेच आज भाजपचे इतरही काही नेते भाजपला रामराम ठोकणार आहेत.

भुसावळ मधील भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या पत्नी खडसे यांच्यासोबात आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तसेच भाजपचे इतरही दोन  माजी आमदार सावकारे यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करतील.  धुळे शहादा अकलाकुवा अकोला येथील माजी आमदार आज स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीत प्रवेश करतील. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होईल.

भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्ह्याचे माजी अध्यक्ष देखील आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. मुक्ताई नगरपालिका आणि बोदवड नगरपालिकेतील अनेकजण देखील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तसेच भाजपचे अनेक कार्यकर्ते आज एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

दरम्यान, काल पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी अनेक भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

भाजप पक्षांतर्गत माझ्या विरोधात चाललेल्या कट कारस्थानाचे पुरावे मी पक्षाला दिले. मात्र, तरीदेखील पक्षश्रेष्ठींनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आता पक्षाला माझी गरज नाही हे माझ्या लक्षात आलं आहे, असं खडसे यांनी म्हटलं होतं.

तसेच गेल्या सहा महिन्यांपासून माझ्या पक्षांतराविषयी चर्चा चालू आहेत. मात्र, तरी देखील कोणीही माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ चंद्रकांत पाटील हे मला फोन करून यातून मार्ग काढू असं म्हटले. पण अखेरपर्यंत त्यांनी मार्ग काढला नाही, असाही आरोप खडसे यांनी केला होता.

राज्यात भाजप आणि शिवसेनेचं सरकार असताना भाजपच्या अनेक मंत्र्यांवर आरोप करण्यात आले. मात्र, केवळ मलाच राजीनामा देण्यास सांगितले. इतर सर्व नेत्यांना क्लीन चीट देण्यात आल्या. इतरांच्यात आणि माझ्यात भेदभाव का?, असा सवाल खडसे यांनी यावेळी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-