महाविकास आघाडीला मोठा धक्का! धुळे विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचा ‘हा’ आमदार विजयी

मुंबई |  धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद पोट निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झालेली आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेद्वार अभिजीत पाटील यांच्याविरुद्ध अमरीश पटेल रिंगणात उतरले होते.

भाजपचे अमरीश पटेल या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अभिजित पाटील यांना धूळ चारली आहे. परंतु या निवडणुकीची अद्याप औपचारिक  घोषणा झालेली नाही.

धुळे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद पोट निवडणुकीसाठी 437 मतदारांना मतदानाचा अधिकार होता. यातील 434 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. म्हणजेच या निवडणुकीत तब्बल 99.31 टक्के मतदान झाले होते.

मतमोजणीच्या वेळी 434 मतांपैकी 4 मतं बाद करण्यात आली होती. यातील 430च मतं ग्राह्य धरण्यात आली होती. यातील 216 प्रथम प्रधान्यांची मतं घेणारा उमेद्वार विजयी होणार, असा कल होता.

या पोट निवडणुकीची मतमोजणी सुरुवात झाल्यापासूनच मतदारांचा कौल भाजपच्या अमरीश पटेल यांच्या दिशेने दिसत होता. मतमोजणीच्या अखेर पटेल यांना तब्बल 332 मतं मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या अभिजित पाटील यांना केवळ 98 मतं मिळाली आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून तिन्ही पक्ष संयुक्तपणे लढवत असलेली ही पहिलीच स्थानिक निवडणूक आहे. यामुळे या निवडणुकीच्या निकालावर सर्वांचंच लक्ष लागून आहे. अशातच धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानं आता महाविकास आघाडीला पहिला झटका बसला आहे.

तसेच शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीला देखील सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एका स्थानिक प्राधिकारी मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लग्नाच्या कित्येक वर्षानंतर शिल्पाचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, सलमान रात्री माझ्या घरी यायचा आणि मग…

सुशांत प्रकरणातील रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा; ‘या’ व्यक्तीचा जामीन मंजूर

सुशांतनं ‘या’ बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मागं टाकलं; रिया टाॅपवर!

उद्योगातून नव्हे तर शेतीतून दरवर्षी तब्बल 40 लाखांपेक्षा जास्त उत्पादन घेते ‘ही’ महिला

कंगनाच्या भावाचा लग्नादरम्यानचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पहा व्हिडिओ