पुणे | पुणे रेल्वे स्टेशन परिसरात चक्की विक्री करणारे प्रविण वानखेडे आणि त्यांची पत्नी हे दाम्पत्य अंध आहे. सध्या लॉकडाउनच्या काळात सर्वसाधारण व्यक्तीला अनेक अडचणींना समोरे जावे लागत असताना या दाम्पत्याला तर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काल वानखेडे यांच्या घरातील गॅस सिलेंडर संपल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
रोजगार बुडाल्याने आर्थिक चणचण आणि ते राहत असलेला भाग सील केल्यामुळे त्यांना सिलेंडर घेणंही शक्य होत नव्हतं. त्यांची ही अडचण वानवडी पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः या दाम्पत्याला सिलेंडर आणून दिला आणि सुरक्षेसाठी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला.
पोलिसांच्या या मदतीसाठी प्रविण वानखेडे यांनी त्यांचे आभार मानले तसेच आपल्यासारख्यांच्या अडचणीही शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
माझ्या सारख्या अनेकांच्या हाताला सध्या काम नाही, त्यामुळे त्यांची अवस्था बिकट बनली आहे. याची दखल घेऊन शासनानं पुढील काही दिवसांसाठी आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा ‘तो’ दावा खोटा- अनिल देशमुख
-“सरकारच्या कामावर शरद पवार समाधानी, राज्य सावरण्यासाठी त्यांची धडपड अद्भुत”
-संजय राऊत यांच्या ‘त्या’ मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध; ट्विटरवरुन दिलं उत्तर
-निर्मला सीतारामन यांनी सोनिया गांधींना हात जोडून केली विनंती, म्हणाल्या…
-महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे असं दिसतंय- नितेश राणे