BMC चा नारायण राणेंना दणका! पुन्हा बजावली नोटीस

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राणे कुटुंबीयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी पुन्हा वाढल्याचं पहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेकडून नारायण राणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

नारायण राणे यांच्या जुहू इथल्या अधीश बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्यात आलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा जुहु येथील बंगल्याप्रकरणी नारायण राणेंना नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबई महापालिका कायदा 1988 च्या कलम 351 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. नारायण राणे यांना महापालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नारायण राणे या नोटीसीमध्ये उत्तर देण्यासाठी 7 दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. कोणत्या फ्लोअरवर काय बदल करण्यात आले याची यादीचं मुंबई महापालिकेनं नारायण राणे यांना नोटीसमध्ये पाठवली आहे.

जुहु येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी राणे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यानंतर राणे यांनी 19 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं.

दरम्यान, बंगल्याचं 100 टक्के कायदेशीर काम केलं आहे. मनापानं सर्व मंजुरी दिलेल्या आहेत, असं राणे यांना पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

दरम्यान, नारायण राणे मविआमधील वाद पुन्हा वाढण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे आता काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Pune: चप्पल फेकी प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

  पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेक, वाचा काय आहे प्रकरण 

  IPL 2022 चं बिगुल वाजलं: कोणाचा सामना कोणाशी होणार?, वाचा एका क्लिकवर

  “ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त”

  “पंतप्रधान मोदीच देव असल्यासारखं भाजपचं वर्तन”