मुंबई | सोशल मीडियावर केव्हा काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर अभिनेता बॉबी देओलचा 24 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी बॉबी देओलने 24 वर्षांपूर्वीच कोरोनाची भविष्यवाणी केली असल्याचं बोलत आहेत.
जवळपास वर्षभरापूर्वीपासून कोरोना महामा.रीने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. सर्वच लोक या महामा.रीला अक्षरशः कंटाळले आहेत. अशातच बॉबी देओलचा 24 वर्षांपूर्वीचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ या महामा.रीच्या काळात लोकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे.
जणू 24 वर्षांपूर्वीच बॉबी देओलला कोरोनाची चाहूल लागली होती, असं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बॉबीने मास्क घातलं आहे. तो सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील करत आहे.
तसेच बॉबी देओल या व्हिडिओमध्ये हात स्वच्छ धुवत आहे. त्याने स्वतःला विलगिकरणात देखील ठेवलं आहे. एवढंच नाही तर बॉबी देओल ऐश्वर्याची पीसीआर चाचणी घेताना देखील दिसत आहे. 1997 साली बॉबी देओलचा प्रदर्शित झालेल्या ‘और प्यार हो गया’ या चित्रपाटातील हा सीन आहे.
24 वर्षांपूर्वीच्या बॉबी देओलच्या चित्रपटातील सीन एकत्र करून एका एडिटरने हा व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बघता बघता हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ आणि याच्याशी संबंधित मिम्स आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केल्या आहेत.
नेटकरी यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स 24 वर्षांपूर्वी बॉबीला कोरोनाच्या सं.कटाची चाहूल लागल्याचं बोलत आहेत. तर काही नेटकरी बॉबी देओलची खिल्ली उडवत आहेत.
दरम्यान, नुकतंच बॉबी देओल ‘आश्रम’ या वेबसिरीजमध्ये दिसला होता. आश्रम मधील बॉबी देओलच्या भूमिकेने सर्वांचीच मने जिंकली आहेत. माहितीनुसार बॉबी देओल लवकरंच ‘अपने 2’ या चित्रपटात दिसेल.
@hvgoenka … Bobby Deol predicted Covid-19. Video made by @Bobbywood_ pic.twitter.com/iXHTW3fq3Y
— Bhipesh (@BhipeshH) March 28, 2021
महत्वाच्या बातम्या –
‘माझे आजोबाच माझं लैं.गिक शो.षण करायचे’; ‘या’ बड्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!
अचानक या सिंहाला काळ समोर दिसला अन् तो जागीच तडफ.डून म.रण पावला; पाहा व्हिडीओ
पार्किंगच्या वादातून अभिनेता अजय देवगनला मारहाण? व्हिडीओ व्हायरल
“वाझेंनी असा कोणता खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं”