Top news मनोरंजन

अखेर तारीख ठरली! आमिर खानने केली मोठी घोषणा

Amir khan e1642780763155
Photo Courtesy- Facebook/Aamir Khan Forever

मुंबई | बाॅलिवूूड सुपरस्टार आणि मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या आमिर खानचा (Aamir Khan) बाॅलिवूडमध्ये मोठा दबदबा आहे. वर्षातून एखादा चित्रपट काढणाऱ्या आमिरच्या चित्रपटाची सर्वजण वाट पाहत असतात.

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट गेल्या दोन वर्षापासून चर्चेचा विषय होता. अशातच आता हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे.

या चित्रपटाद्वारे आमिर खान पुन्हा एकदा पडद्यावर सिनेमाची जादू पसरवून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत विविध अफवा पसरल्या होत्या, त्यानंतर आता आमिर खान प्रॉडक्शनने औपचारिक घोषणा करून यावर पूर्ण विराम दिला आहे.

लाल सिंह चड्ढा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी म्हणजेच बैसाखीला प्रदर्शित होणार असल्याचं आमिर खान प्रॉडक्शनने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलं आहे.

चित्रपटात एक प्रेमकथा आहे. नायकाच्या प्रवासाच्या वेगवेगळ्या कालखंडात पसरलेली आहे. आमिर खानचा चित्रपट हा 1994 च्या प्रसिद्ध हॉलीवूडपट फॉरेस्ट गंप वर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, चित्रपटात ऑपरेशन ब्लू स्टार आणि बाबरी मशीद विध्वंस देखील दाखवण्यात आला होता. या चित्रपटात आमिर एका शीख तरुणाच्या भूमिकेत असून त्याच्यासोबत करीना कपूर आहे.

पाहा पोस्ट-


महत्त्वाच्या बातम्या – 

प्रियंका गांधी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत??? मोठं वक्तव्य आलं समोर

 Sushant Singh Rajput: अभिनय सोडून सुशांत करणार होता हे काम, मोठी माहिती हाती

“शरद पवारांचा हा ढोंगीपणा, ज्या छगन भुजबळांना राष्ट्रवादीत घेतलं त्यांनीच…”

“मी कशाला त्यांची भेट घेऊ? आतापर्यंत कधीच शरद पवारांच्या…”

 नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! इंडिया गेटवर उभारणार सुभाष बाबूंचा भव्य पुतळा