सौ सौ सलाम आपको…!; परेश रावलांनी केलं मोदींचं कौतुक

नवी दिल्ली : राज्यसभेत गृहमंत्री अमित शहांनी जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवण्याची शिफारस केली. राज्यसभेत यावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळाला. मोदी सरकारच्या या निर्णयाचं ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी कौतुक केलं आहे. 

आज आपल्या मातृभूमीला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं आहे. आज खऱ्या अर्थाने भारत एकवटला आहे. जय हिंद!, असं म्हणत परेश रावल यांनी मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं. 

मोदींना आपले शत् शत् नमन, असं ट्वीट परेश रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना ट्वीट टॅग केला आहे.त्या ट्वीटसोबत परेश रावल यांनी मोदींचा एक जुना फोटोही शेअर केला आहे. 

आता कोण आजारी पडणार नाही, असं उपरोधात्मक ट्वीटही परेश रावलांनी केलं आहे. या ट्वीटवरुन त्यांनी मोदी सरकारच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 

अमित शहांनी राज्यसभेत मांडलेल्या प्रस्तावामुळे राजकीय वर्तुळासह कलाविश्वातूनही प्रतिक्रिया येेण्यास सुरवात झाली आहे. राजकीय कारकीर्दीदरम्यान चर्चेत असलेल्या परेश रावल यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान, परेश रावल यांनी केलेल्या ट्वीटला काही वेळातच अनेकांनी शेअर केलं आणि लाईक करत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; जम्मू-काश्मीरसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय

-जम्मू काश्मीरसंदर्भात मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय

“मुख्यमंत्री महोदय, जनतेची कामं केल्याचा दावा करता तरी तुमच्यावर ही वेळ का येते?”

-“चंद्रकांत पाटील साधे आहेत; त्यांना पत्रकारांच्या गुगली कळत नाहीत”

-विधानसभा निवडणूक लढवणार का??? अशोक चव्हाण म्हणतात…