लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक

मुंबई | गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

सगळीकडे आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत खूप जास्त प्रमाणात वाढ होत आहे.तरीही नागरिक यासगळ्याकडे गांभीर्याने बघत नसल्याचं दिसतं आहे. त्यामुळे सरकारने घालून दिलेल्या निर्बंधांचे कडक पालन न झाल्यास पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

अशातच बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिलला लॉकडाऊच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जिमीला आज सकाळी पंजाब पोलिसांनी लुधियाना येथून ताब्यात घेतलं असल्याचं समजतं आहे.

लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग-धंदे, कामकाज बंद राहणार असल्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या होत्या. परंतू तरीही या नियमांना न जुमानता जिमी आपल्या चित्रपटाचे शूटिंग करत होता.

महत्वाची बाब म्हणजे तो ज्याठिकाणी चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांपैकी कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हते. तसेच त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचेही पालन करत नसल्याचं निर्देशनास आले.

लुधीयानामधील एका शाळेत चित्रपटाचं शूटींग सुरू असल्याचं काही लोकांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता, खरोखरचं त्या ठिकाणी शूटिंग सुरू होतं. परंतू त्या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या मते चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी विशेष परवानगी घेऊनच चित्रीकरणाला सुरूवात केली होती. तसेच पोलिस सध्या या प्रकरणाची अजून चौकशी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या! कोरोना संसर्गादरम्यान व्यायाम करणे आरोग्यासाठी…

1 मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारने दिली…

तुम्हीही बद्धकोष्ठतेच्या समस्येनी त्रस्त असाल तर…

‘या’ व्हिडीओमुळे अभिनेत्री काजोल देवगण होतीय…

कोरोना काळातील अनोख्या पद्धतीचं लग्न पाहिलत का?, नसेल तर…