प्रियंकाचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, ‘या’ एका व्हिडिओमुळे मिळाल्या होत्या बला.त्काराच्या ध.मक्या

मुंबई | अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही एक बॉलिवूड मधील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रियंकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्री बरोबरंच प्रियंकाने हॉलिवूडमध्ये देखील आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

देसी गर्ल प्रियंकाने आता आपल्या आयुष्यावर आधारित एत पुस्तक लिहीलं आहे. ‘अनफिनिश्ड’ असं या पुस्तकाचं नाव आहे. प्रियंकाचं हे पुस्तक लवकरंच वाचकांच्या भेटीला येणार आहे. प्रियंकाने ट्विटर वरुन याबद्दल माहिती दिली आहे.

प्रियंकाने अनफिनिश्ड या पुस्तकात आपल्या आयुष्यातील अनेक कडू गोड आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच इंडस्ट्रीची पडद्याआड लपलेली बाजू सर्वांसमोर आणण्याचा देखील प्रियंकाने या पुस्तकाच्या माध्यामातून प्रयत्न केला आहे. करिअरच्या सुरुवातीला आपल्याला ब.लात्का.राच्या ध.मक्या आल्याच्या देखील प्रियंकाने या पुस्तकात सांगितले आहे.

प्रियंकाने 2012 साली प्रसिद्ध पॉपस्टार पिटुलसोबत एक म्युझिक व्हिडीओ केला होता. ‘इन माय सीटी’ असं या म्युझिक अल्बमचं नाव होतं. याच म्युझिक व्हिडीओतून तिने पाश्चात्य मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं होतं. मात्र, या व्हिडीओनंतर तिच्यावर अनेकांनी जोरदार टि.का केली होती.

यावेळी अनेकांनी तिच्या विरोधात रंगभेदी टीका केल्या. काहींनी तर तिचा सावळी द.हशतवादी असा देखील उल्लेख केला होता. तुझ्या देशात परत जा आणि सामुहीक ब.लात्कार करुन घे, असंही काही अमेरीकन ट्रो.लर्स प्रियंकाला म्हणाले होते.

दरम्यान, प्रियंकाने बॉलिवूड  मधील काही वाईट अनुभव देखील या पुस्तकात शेअर केले आहेत. एकवेळ प्रियंका चोप्राला चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शकाने अंतर्व.स्त्र दाखवण्याची मागणी केली होती. एका हिंदी चित्रपटाच्या शुटींग वेळी एका दिग्दर्शकाने तिच्याकडे अशाप्रकारची मागणी केली असल्याचं तिने त्या पुस्तकात सांगितलं आहे. मात्र, प्रियंकाने दिग्दर्शकाचे नाव आणि त्या चित्रपटाचे नाव सांगितले नाही.

चित्रपटातील आयटम सॉंगसाठी प्रियंकाला अंगावरील कपडे उतरवायला सांगितले होते. याला पर्याय म्हणून प्रियंकाने अंगावर अतिरिक्त कपडे म्हणजेच बॉडी सूट घालण्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला. जेणेकरुन गाण्यामध्ये संपूर्ण कपडेही काढल्याचे दिसेल आणि कॅमेऱ्यासमोर लाजही राखली जाईल.

बॉडी झाकण्यासाठी बॉडी लेअरचा वापर केला तरी गाण्यात तुझी अं.तर्वस्त्र दिसायलाच हवी. नाहीतर प्रेक्षक चित्रपट पहायला येणार नाहीत आणि त्यांना सिनेमा देखील आवडणार नाही, असं दिग्दर्शक म्हणाले असल्याचं प्रियंकाने पुस्तकात लिहिलं आहे.

हेे सगळं ऐकल्यानंतर प्रियंकाला खूप मोठा ध.क्का बसला. तिने दिग्दर्शकाला समजवण्याचा प्रयत्न केला. प्रियंकाने शुटींग सोडून जाण्याचीही ध.मकी दिली. परंतू त्यांनी तिचे ऐकले नाही. शेवटी प्रियंकानेच तो चित्रपट करण्यास नकार दिला. प्रियंकाचा हा निर्णय दिग्दर्शकाला महागात पडला आणि चित्रपटाचे खूप नुकसान झाले.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! खासदार डेलकरांच्या पोस्टमा.र्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

पतंजलीला मोठा झटका! ‘या’ औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही

काय सांगता! 15 मेपासून व्हॉट्सअपवर मेसेज पाठवता येणार नाहीत?

तुम्हालाही गोरी आणि चमकदार त्वचा हवी आहे का?, मग हा घरगुती स्क्रब नक्की वापरुन पाहा