मोठी बातमी! अभिनेत्री दीपिका पादुकोनची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दीपिका पादुकोनच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

हैद्राबाद येथे एका शुटींगदरम्यान दीपिकाची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर तिला तातडीने रूग्णालयात दाखल केलं.

‘प्रोजेक्ट के’च्या निमित्ताने दीपिका हैद्राबादला गेली होती. हैद्राबादच्या रामोजी फिल्म सिटी येथे शुटींग करत असताना दीपिकाची तब्येत बिघडली.

दीपिका पादुकोनला रूग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली. मात्र, आता ती मुंबईसाठी रवाना झाल्याचं म्हटलं जात आहे.

साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचं शुटींग करत असताना दीपिकाला अचानक अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे.

दीपिका नंतर शुटींगला परतली असली तरी याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती दीपिकाच्या टीमकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे दीपिकाच्या तब्येतीबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत.

दरम्यान, दीपिका लवकरच अभिनेता शाहरूख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता ह्रतिक रोशनसोबत ‘फायटर’ व प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट के’ मध्येही झळकणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

देहूत अजित पवारांना भाषणाची संधी नाही; सुप्रिया सुळे कडाडल्या, म्हणाल्या…

“पंकजा मुंडेंचा राजकीय एनकाऊंटर करण्याचा भाजपमधून प्रयत्न होतोय”

पंतप्रधान मोदी आणि अजित पवारांच्या विमानतळावरील ‘त्या’ फोटोची का होतेय चर्चा?

पालखी मार्गाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत”