Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

प्रेक्षकांना भुरळ घालणारी रेखाची ‘ती’ भूमिका आता श्रद्धा साकारतेय; वाचा सविस्तर

मुंबई |  श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिनेअभिनेत्री आहे. 2010 साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रद्धाचा 2013 सालचा ‘आशिकी 2’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला होता. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं होतं.

श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच एका नवीन भुमिकेत पहायला मिळणार आहे. श्रध्दा आता या चित्रपटात श्रीदेवी सारखी नागिनची भूमीका साकारणार आहे.

चित्रपट निर्माता निखिल व्दिवेदी हे ‘नागिन’ वर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या समोर आणनार आहेत. जो तीन भागात बनवला जाणार आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार श्रद्धाने हा चित्रपट साइन केला आहे. श्रद्धा या चित्रपटासाठी प्रचंड उत्साही आहे.

‘नागीन’ चित्रपटातील श्रीदेवी यांनी साकारलेली भूमिका मला केव्हातरी करायची आहे, असं श्रद्धानं म्हटलं होतं. यापूर्वी मोठ्या पडद्यावर श्रीदेवी सोडून रेखा आणि रीना रॉय सारख्या बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्रींनी ‘नागिन’ ची भूमिका साकारली आहे.

अशा परिस्थितीत श्रद्धासाठी ही मोठी संधी आहे. सुरुवातीच्या काळात ‘स्त्री’ या चित्रपटातील तिचे पात्रदेखील खूप वेगळे होते. श्रद्धा साकारत असणारी नागिणीच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांना समजताच सोशल मीडियावर लोक तिची भूमिका पाहण्यास उत्सुक असल्याचं बोलत आहेत.

तर श्रद्धा लवकरच बॉक्स ऑफिसवर धमाका करायला तयार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही यावर बोलताना श्रद्धा म्हणाली की, पडद्यावर ‘नागीन’ ही व्यक्तिरेखा साकारताना मला खूप आनंद वाटतो. ‘नगीना’ आणि ‘निगाहें’ चित्रपटांसाठी श्रीदेवीचे कौतुक ऐकून मी मोठी झाली आहे. निखिल द्विवेदी निर्मित हा चित्रपट एक प्रेमकथा असणार आहे. जो काही विशेष प्रभावांनी तीन भागांमध्ये बनविला जाईल.

अजून या सिनेमाचं टायटल ठरलेलं नाही. 2017मध्ये ‘लपाछपी’ हा द्विवेदी यांचा लोकप्रिय सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता द्विवेदी आणखी एक हटके चित्रपट प्रेक्षकांसाठी घेवून येत आहेत. या चित्रपटात श्रद्धा कपूरचा हिरो कोण असेल?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीने मैदानातून अनुष्काला विचारला ‘तो’ प्रश्न; प्रेक्षक झाले हैराण!

कंगना राणावतला अट.क होणार? न्यायालयाने कंगना विरुद्ध पोलिसांना दिले महत्वाचा आदेश

‘बिहार प्रचारात मला धमकावत माझ्यावर बला.त्कार…’; ‘या’ अभिनेत्रीचा बड्या नेत्यावर धक्कादायक आरोप!

पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवारांचा इशारा? पंकजा मुंडेंचं कौतुक करत पवार म्हणाले…

रियाला सीबीआयचा पुन्हा दणका! सुशांतच्या बहिणींवरील आरोप फेटाळत सीबीआयनं रियाला…