बाॅलिवूडला कोरोनाचं ग्रहन! आणखी एक अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात

मुंबई| भारतात कोरोनाची दूसरी लाट आल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. या लाटेत लहानांपासून तर वृद्धांंपर्यंत नागरिक बाधित होताना दिसत आहेेत. याचा फटका बाॅलिवूडलाही बसला असून अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेते, राजकीय व्यक्ती अशा अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

दररोज एका तरी सेलिब्रिटीला कोरोनाची लागण होते आहे. आता कोरोना पॉझिटिव्ह सेलिब्रिटींच्या यादीत कतरिना कैफचा सुद्धा समावेश झाला आहे. कतरिनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हल आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कतरिनाने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

कतरिनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले आहे. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करुन घ्या’ असे तिने म्हटले आहे.

याअगोदरही अनेक कलाकार कोरोना बाधित झाले होते. यामध्ये आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी, आमिर खान, आर. माधवन, गोविंदा आणि अक्षय कुमार, भूमी पेडणेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

विकी कौशलचं नाव कतरिनासोबत जोडलं जातं. 5 एप्रिल रोजी विकी कौशलने इन्स्टाग्राम अकाऊंट पोस्टद्वारे करोना झाल्याचे सांगितले. “संपूर्ण काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ची करोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या,” अशा आशयाची पोस्ट विकीने केली होती.

दरम्यान, अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सलमान खानसोबत आगामी चित्रपट ‘टायगर 3’च्या चित्रीकरणात व्यस्त होती. कोरोनामुळे मुंबईतच ‘टायगर 3’साठीचा तुर्कीश सेट तयार करण्यात आला आहे. या सेटवर तोफखाना टाकी आणि ग्रेनेड इत्यादींचा उपयोग केला जाणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

देशाची चिंता वाढवणारी बातमी. कोरोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. गेल्या 24 तासांत देशात 1,15,736 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याआधी 5 एप्रिलला पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार करत सर्वाधिक रुग्णवाढ झाली होती. यासोबत देशातील रुग्णांची एकूण संख्या 1,28,01,785 इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

तरूणाने केला हवेत खतरनाक स्टंट, व्हिडीओ पाहून तुमच्याही…

केस कापताना तो ओक्साबोक्सी रडू लागला, व्हिडीओ पाहून तुम्ही…

अजून बोलताही येत नाही तोच पोरगं म्हणतंय गाणं, पाहा…

मंदिराच्या दानपेटीत टाकला होता कंडोम, एक रक्ताच्या उलट्या…

दयाबेनला पहिल्या शोसाठी मिळाले होते फक्त ‘इतके’…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy