Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘या’मुळे बॉलिवूडची अभिनेत्री राधिका मदनने सोडला महाराष्ट्र

Photo Credit- Instagramm/Radhika Madan

मुंबई | बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात.

मागिल वर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. मागिल काही महिन्यात पुन्हा सगळं रुळावर आलं असल्याचं दिसतं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने काही निर्बंद लागू केले आहेत. परंतू तरीही कोरोना आटोक्यात येत असल्याचं दसून येत आहे. सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे.

राज्यात कोरोना रुग्णांचा अकडा वाढतच चालला असल्यामुळे सरकारने 15 मेपर्यंत लॉकडाऊन केलं आहे. सुरूवातीला सरकारने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याचं सांगितलं होतं. परंतू परिस्थिती गंभीर होत असल्यामुळे हे लॉकडाऊन 15 मेपर्यंत कायम राहणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

यादरम्यान सर्व उद्योग धंदे, व्यवसाय यांना बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच चित्रपटाचे चित्रीकरणही बंद ठेवण्यास सांगतले आहे. तसेच चित्रपटगृहही बंद असल्यामुळए जे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत तेही प्रदर्शित करता येत नाहीयत.

याकाळात सर्वांना घरात बसण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. याच लॉकडाऊनला कंटाळून बॉलिवूडची अभिनेत्री राधिका मदनने महाराष्ट्र सोडायचा निर्णय घेतला आहे.

राधिका मुळची दिल्लीची आहे. ती बॉलिवूड चित्रपटाच्या निमित्तानं ती मुंबईत राहत होती. परंतू आता सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे घरात एकटं राहण्यापेक्षा, तिनं तिच्या घरी कुटुंबासोबत वेळ घालवायचा असल्याचं ठरवलं आहे.

राधिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत या सगळ्याची माहिती दिली आहे. तसेच राधिकाने 2018 साली पटाखा या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पन केलं. त्यानंतर ती मर्द को दर्द नही होता या चित्रपटात पाहायला मिळाली. परंतू राधिकाला खरी ओळख अंग्रेजी मिडिअम या चित्रपटामुळे मिळाली.

ती या चित्रपटामध्य बॉलिवूड सुपस्टार इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. यापुढे राधिका आपल्याला फिल्म लाईक इश्क आणि रे या वेब सिरीजमधून लवकरत सर्वांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही वेब सिरीजमध्ये तिच्या भूमिका एकमेकांपासून भिन्न असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऑनलाईन क्लास संपला मात्र कॅमेरा राहिला ऑन, त्यानंतर…

डॉक्टरचा ‘हा’ फोटो होतोय सोशल मीडियावर तूफान…

कौतुकास्पद! बायकोचे दागिने विकून पठ्ठ्यानं रिक्षाला बनवलं…

कोरोना योद्धाला सलाम! कोरोनाने आई, वडिल, भावाचा मृत्यू तरीही…

चक्क लांडग्याने सिंहाची शेपटी खेचली अन्…, पाहा व्हिडीओ