बॉलिवूडच्या ‘या’ खलनायक अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

मुंबई| सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. कोरोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. देशात अनेक ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध, लॉकडाऊन लावला जात आहे. विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

भारतात कोरोनाची दूसरी लाट आल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. या लाटेत लहानांपासून तर वृद्धांंपर्यंत नागरिक बाधित होताना दिसत आहेेत. याचा फटका बाॅलिवूडलाही बसला असून अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

दररोज एका तरी सेलिब्रिटीला कोरोनाची लागण होते आहे. आता कोरोना पॉझिटिव्ह सेलिब्रिटींच्या यादीत बॉलिवूडचा खलनायक अभिनेता आशुतोष राणाचाही समावेश झाला आहे.

आशुतोष राणाने स्वतःचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘दुर्गासमान असलेल्या आपल्या शरीरामध्ये 9 द्वार असतात. द्वारात विराजमान असलेली परमचेतना, रक्षण करणाऱ्या शक्तीला दुर्गा म्हटलं जातं. आज भारतीय  नववर्षाची सुरूवात झाली. आजपासून नऊ दिवस दुर्गेचे पुजन केलं जातं.’ असं लिहीलं आहे.

पुढे आशुतोष म्हणाले, ‘अशा मंगल दिवशी जर तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल माहिती मिळत असेल, तर फार चांगलं आहे. मला आजचं कळालं की मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. मी तात्काळ या आजारातून  मुक्त होण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. मला विश्वास आहे, मी लवकरच बरा होईल.’

आशुतोष राणाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. चाहत्यांनी राणा लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना सुरु केली आहे. गेल्या 6 एप्रिलला आशुतोषने पत्नी रेणुका शहाणेसोबत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. रेणुकाने तिच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर याची माहिती दिली होती.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेते, राजकीय व्यक्ती अशा अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

देशाची चिंता वाढवणारी बातमी. कोरोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे.

https://www.facebook.com/ashutosh.rana.585/posts/4152285768149547

महत्वाच्या बातम्या – 

दोन लग्न तुटल्यानंतर शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम…

कडाक्याच्या उन्हात हत्तीच पिल्लू पाण्यात पोहण्याचा आनंद कसं…

साडे सात लाख रुपयांसाठी तो विषारी सापांमध्ये झोपला…

काजोलच्या गाण्यावर मुलगी न्यासाचा जबरदस्त डान्स, पाहा…

आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘या’ मराठी चित्रपटानं…