बोंबला! गूगल मॅपमुळे दुसऱ्याच्याच लग्नात पोहचला नवरदेव अन्…; पाहा व्हिडीओ

मुंबई | आज इंटरनेटमुळे सर्व काही सोयीस्कर झालं आहे. सर्वच गोष्टी अगदी एका क्लिकवर उपलब्ध होतात. जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली कोणतीही गोष्ट क्षणार्धात आपल्या पर्यंत पोहचते. या इंटरनेटचे भरपूर सारे फायदे असले तरी काही तोटे देखील आहेत.

इंटरनेटमुळे अनेक विचित्र घटना देखील घडत असतात. सध्या अशीच एक घटना इंडोनेशियामध्ये घडली आहे. एक नवरदेव गुगल मॅपमुळे स्वतःच्या लग्न मंडपात न जाता दुसऱ्याच्याच लग्नात पोहचल्याची घटणार इंडोनेशियामध्ये घडली आहे.

इंडोनेशियातील एका गावात एकाच दिवशी दोन कार्यक्रम होते. एका ठिकाणी साखरपुडा होता. तर दुसऱ्या ठिकाणी लग्न होतं. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी नवरदेवाची वरात नवरीच्या घरी जाण्यासाठी निघाला. वऱ्हाडी मंडळींला लग्नस्थळ माहीत नव्हतं. यामुळे वऱ्हाडी मंडळींनी गूगल मॅपचा आधार घेतला.

या गूगल मॅपने नवरदेवाला नवरीकडे पोहचवलं खरं. मात्र ही नवरी त्या नवरदेवाची नाही तर दुसऱ्याच नवरदेवाची होती. या नवरदेवाची वरात चुकीच्या स्थळी पोहचली असली तरी नवरीकडच्या लोकांना देखील हे लक्षात आलं नाही.

नवरीकडच्या लोकांनी वऱ्हाड्यांचं मस्तपैकी स्वागत केलं. सर्व पाहुण्यांना फ्रेश होण्यासाठी व्यवस्था केली. यानंतर पाहुण्यांच्यात संवाद चालू झाला आणि हे सर्व प्रकरण उघडकीस आलं.

माहितीनुसार, या नवरदेवाचं लग्न लोसारी हॅमलेट या गावात होतं. मात्र, हे गाव नक्की कुठे आहे हे वऱ्हाडींना माहित नव्हचं. यामुळे वऱ्हाडी मंडळींनी गूगल मॅपवर गावाचं नाव टाकलं. तर गूगल मॅपने या नवरदेवाला जेंगकोल हॅमलेट या गावात पोहचवले. ही दोन्हीही गावे शेजारी शेजारी आहेत. दुर्दैवाने या गावात देखील साखरपुड्याच्या कार्यक्रम होता. यामुळे सर्वांचीच चुकभूल झाली.

हा सर्व गोंधळ बाहेर चालू असताना नवरीला याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. नवरी खूप आनंदी होती रूममध्ये मेकअप करत होती आणि बाहेर हा सर्व गोंधळ चालू होता. चुकीच्या नवरदेवाची वरात माघारी जाताना नवरीला हा गोंधळ समजला.

दरम्यान, चुकीच्या नवरदेवाची वरात माघारी जात असताना काहींनी हा व्हिडीओ शूट केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. लोक यावर मजेशीर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

या महिलेला रस्त्यात असं काही दिसलं की ती पळत गेली अन्…; व्हिडीओ व्हायरल

हवामान खात्याचा इशारा! पुढील काही तासांतच ‘या’ भागात होणार अतिवृष्टी

जान्हवी कपूरच्या ‘या’ फोटोने चाहते घायाळ, पाहा…

जंगलात असं काही घडलं की, पाहा व्हिडीओ

बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत, अमिरची लेक आयरा म्हणाली…