बोंबला! कैद्याच्या प्रेमात पडलेल्या महिला जेलरने केलं असं काही की आज आहे गजाआड

नवी दिल्ली | सोशल मीडियामुळे आज जग खूप जवळ आलं आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडलेली घटना क्षणार्धात आपल्यापर्यंत पोहचते. यामुळे जगभरात घडणाऱ्या अनेक गोष्टींच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत असतात. सध्या ब्रिटन मधील एका कैद्याच्या प्रेमात पडलेल्या महिला जेलरची अशीच सोशल मीडियावर खूप चर्चा चालू आहे.

एखादी महिला जेलर कैद्याच्या प्रेमात पडली तर काय होईल? त्या कैद्याला स्पेशल वागणूक मिळेल. अनेक गोष्टींमध्ये त्याला सूट देण्यात येईल. बरोबर ना? असंच काहीसं ब्रिटन मधील एका तुरुंगात घडलं आहे.

या महिला जेलरचं नाव आहे स्कारलेट एल्डरी. स्कारलेट एल्डरीचे वडील देखील एक पोलीस अधिकारी आहेत. स्कारलेट जेलर बनण्या अगोदरपासून तिचं एका कैद्यासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. ती नेहमीच या कैद्याविषयी चिंतेत असायची.

स्कारलेट या कैद्याला नेहमीच मदत करत असायची. तसेच ज्यावेळी ती जेलर बनली नव्हती त्यावेळी ती या कैद्याला गुप्त पत्र पाठवत होती. स्कारलेट जेलर बनल्यानंतर तिने आपल्या प्रियकराला तुरुंगात एक सिम कार्ड आणि मोबाईल देखील उपलब्ध करून दिला होता.

एक दिवस स्कारलेटच्या या कारनाम्याची माहिती इतर पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली आणि तिला सस्पेंड करण्यात आलं. तसेच तिला 10 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. स्कारलेटचा हा कारानामा उघड झाल्यावर तिचं मेडिकल एक्झामिनेशन करण्यात आलं यावेळी अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत.

स्कारलेटच्या अंगावर अनेक टॅटू आढळले आहेत. यामध्ये तिच्या पायावर एक रहस्यमय टॅटू आढळून आला आहे. स्कारलेटच्या पायावर असलेल्या या टॅटूमध्ये चक्क कैदी प्रियकराचा कॉन्टॅक्ट नंबर लिहिला होता. स्कारलेटच्या मेडिकल एक्झामिनेशनच्या रिपोर्टनंतर एकंच खळबळ उडाली आहे.

तसेच तुरुंगातील इतर कैद्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कारलेट नेहमीच या कैद्याबाबत चिंतेत असायची. तुरुंगात देखील ती सतत त्याच्या बरोबर गप्पा मारताना दिसायची. स्कारलेट नेहमीच त्याला इतरांपेक्षा वेगळी वागणूक द्यायची.

दरम्यान, कोर्टाने स्कारलेटला 10 महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावताना म्हटलं की, स्कारलेटच्या या कृत्यामुळे कैद्याला तर फायदा झालाच आहे. पण त्याबरोबरच तुरुंगाच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

मुलुंडमध्ये भर रस्त्यात ‘हा’ तरुण पोलिसांना शिवीगाळ करत अंगावर धावला अन् मग…; पाहा व्हिडीओ

मुंबईतील ‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन!

‘या’ कारणामुळे अभिनेता अमिताभ बच्चन यांनी डावा हात खिशात घालून केलं होतं ‘शराबी’चं शुटिंग, वाचा काय होतं कारण

अभिनेत्री प्रियंका चोप्रा विमानात पिली होती दारु अन्…,…

शाहरुखची मुलगी सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये राहतेय…