नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरली असं वाटत असताना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटने अनेक देशात थैमान घालायला सुरूवात केली.
कोरोना लसीचा बूस्टर डोस (Booster) घेतल्याने ओमिक्रॉनचा धोका कमी असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. पण लसीचा बूस्टर डोस घेतल्याने ओमिक्रॉनचा धोका टळला असं होत नसल्याचं व्हाईट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांचं मत आहे.
ओमिक्रॉनला आळा घालायचा असेल तर बूस्टर डोससह गर्दी टाळणे अनिवार्य असल्याचं डॉ. फाऊची यांचं मत आहे. त्यामुळे डॉ. अँथनी फाऊची यांनी गर्दी न करण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेले अनेक लोक सुट्टीच्या निमित्ताने कुटुंबासह एकत्र बाहेर येतात पण असं एकत्र बाहेर येणं सुरक्षित नसल्याचं मत डॉ. फाऊची यांनी व्यक्त केलं आहे.
ज्यांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे, ज्यांनी बूस्टर डोसदेखील घेतला आहे त्यांनी देखील एकत्र येणं सुरक्षित नाही. त्यामुळे लोकांनी गर्दी करणं टाळलं पाहिजे, असा सल्ला डॉ. आँथनी फाऊची यांनी दिला आहे.
जिथे जास्त लोक एकत्र जमतात तिथे आपल्याला इतर लोकांच्या लसीकरणाबाबत माहिती नसते. ओमिक्रॉनचा वाढता धोका बघता अशा ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे, असं डॉ. फाऊची यांचं मत आहे.
सुट्ट्याच्या निमित्ताने नागरिक अनेक प्लॅन करत आहेत. पण ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात प्रवास करण्यास, प्रियजनांना भेट देण्याबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला देखील फाऊची यांनी दिला आहे.
दरम्यान, ओमिक्रॉनचा वेगाने होणारा प्रसार बघता अनेक देशांनी पुन्हा निर्बंध लावायला सुरूवात केली आहे. भारतातही 14 राज्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे त्यामुळे देशात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
ओमिक्रॉनचा वाढता धोका बघता केंद्र सरकारने रात्रीच्या संचारबंदीसह गर्दीच्या कार्यक्रमांवर व ठिकाणांवर निर्बंध आणावेत, असा सल्ला सर्व राज्यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
दिलासादायक! रूग्णालयात भरती न होता omicron बाधीतांचे बरे होण्याचे प्रमाण जास्त
राज्यात नाईट कर्फ्यू लागणार का?; मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक
…म्हणून मी स्वत:च्या पक्षाची स्थापना केली- करूणा मुंडे
“…म्हणून आदित्य ठाकरेंना पाहून मी म्याऊ म्याऊ केलं’; नितेश राणेंचं स्पष्टीकरण
Share Market: लाखाचे केले 20 लाख!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई