काँग्रेसच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांची दोन्ही मुले काँग्रेसच्या पहिल्या यादीत?

लातूर : काँग्रेस पक्षाची पहिली यादी हाती लागल्याचा विविध वृत्तवाहिन्यातून दावा केला जात आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव व लातूर शहराचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांचे काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव आहे.

लातूर ग्रामीण मतदारसंघातून विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे यांना डावलून विलासराव देशमुखांचे कनिष्ठ पुत्र व जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांचेही नाव नक्की झाल्याची चर्चा माध्यमातून पुढे आली आहे.

पहिल्यांदाच राज्यात दोन सख्ख्या भावांना लगतच्या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याचा पहिलाच प्रसंग असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. विलासराव देशमुखांनी आपल्या हयातीत २००९ साली आपला राजकीय वारसा ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.

अमित देशमुख हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ९९ हजार मतांनी विजयी झाले होते. गेल्या तीन वर्षापासून लातूर ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख हे उमेदवार राहतील अशी चर्चा सुरू होती. अनेक कार्यक्रमात आमदार त्र्यंबक भिसे यांच्या उपस्थितीतच कार्यकर्ते धीरज देशमुख यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून करत असत. त्यावेळी भिसे यांना अवघडल्यासारख वाटत असे. 

दरम्यान, काँग्रेस पक्षाची अद्याप अधिकृत यादी जाहीर झाली नसली तरी लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांचे तिकीट निश्चित झाल्याच्या चर्चेला मतदारसंघात उधाण आले आहे. 

महत्वाच्या बातम्या-