पुणे महाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांना ‘बाऊन्सर’ची सुरक्षा; आयोजकांचा खबरदारीचा उपाय

अहमदनगर | सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होता आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख यांचे नगर येथे कीर्तन पार पडले. मात्र, त्यांना कीर्तन स्थळी पोहोचवण्यासाठी कडेकोड बंदोबस्त करण्यात आला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर इंदुरीकरांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते.

नगर येथील भिंगार या गावातील शुक्लेश्वर मंदिरात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. या सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत त्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले.

इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन होणार नाही, अशी कुजबुज सुरु झाली होती. मात्र,  महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. तसेच कीर्तनादरम्यान शुटींग न करण्याच्या सुचना लोकांना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून इंदुरीकर महाराज चर्चेचा विषय ठरले आहेत. महाराजांनीही वादावर भाष्य केलं असून हे असंच सुरु राहिल्यास सर्व सोडून शेती करणार असल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“गद्दारांना माझ्या पक्षात जागा नाही, दोन दिवसात गद्दारांची हाकालपट्टी होईल”

-राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती… महापोर्टलद्वारे नाही तर ऑफलाईन होणार!

-इंदुरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनेलवाल्यांना दिला दणका; चॅनेलवाल्यांनी उडवले सर्व व्हिडीओ

-‘2024च्या आधी पुन्हा पुलवामा हल्ला होईल’; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने एकच खळबळ

-यूट्यूबवाले काड्या करतात; यूट्यूब चॅनलवाल्यांनीच मला संपवलं- इंदुरीकर