नवी दिल्ली | सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण अशे मोजकेच व्हिडीओ असतात जे आपल्या लक्षात राहतात.
व्हायरल झालेले काही व्हिडीओ असे असतात जे बघून हसू आवरत नाही. कित्येकदा तर हसून हसून पोट दुखतं पण व्हिडीओ मात्र विसरला जात नाही.
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि विशेष म्हणजे हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
या व्हिडीओत एक मुलगा आणि मुलगी रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या वाटेत एक नाला आला. व्हिडीओतील मुलाने तो नाला सहज ओलांडला पण त्या मुलीला मात्र नाला ओलांडून जायला जमत नाही.
त्यानंतर तो मुलगा त्या मुलीला आपल्या पाठीवर घेतो आणि नाल्यावर टाकलेल्या फळीवरून चालतो. मुलगा मुलीला घेऊन फळीवरून जातो आणि जे व्हायला नको तेच होतं.
नाल्यावरील फळी त्या दोघांचं वजन सहन करू शकत नाही आणि फळी तुटते. फळी तुटताच मुलगा आणि मुलगी दोघेही अचानक नाल्यात पडले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक्ससह मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
i_love.surfing या इंस्टाग्राम पेजवरून हा मजेशीर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
लहान मुलांच्या लसीकरणासाठी शाळा सज्ज; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेणार तातडीची बैठक
आरोग्य विभागात खळबळ; ‘या’ हॉस्पिटलमधील 84 डॉक्टरांना कोरोनाची लागण
मुख्यमंत्री-राज्यपाल पुन्हा आमने सामने; राज्यपालांकडून चौकशीचे आदेश
सुप्रिया सुळेंनी पटकावला नंबर वनचा किताब, लोकसभेत दमदार कामगिरी
भाजप आमदार म्हणतात, “मी अजितदादांचा फॅन, मी त्यांचं…”