पुण्यात अल्पवयीन प्रेयसीची लॉजवर हत्या करुन प्रियकर पसार!

पुणे : अल्पवयीन प्रेयसीचा प्रियकराने ब्लेडने वार करुन खून केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी प्रियकर फरार असून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.घटनेचा अधिक तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर श्रीराम सुग्रीव गिरी असं प्रियकराचं नाव आहे. वडगाव मावळ येथील निसर्गवारा लॉजवर बुधवारी सकाळी हे दोघे गेले होते. दोघेही लॉजमधील 303 क्रमांकाच्या रुममध्ये थांबले होते.

अज्ञात कारणावरून आरोपी प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीच्या गळ्यावर, पोटावर आणि हातावर ब्लेडने वार करून खून केला. गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी घाईघाईत लॉजमधून जात असताना त्याने तेथील कर्मचाऱ्यांना आपली प्रेयसी तयारी करुन खाली येत असल्याचं सांगितलं. त्यानंतर संधी साधून त्याने दुचाकीवरुन पळ काढला. रात्री उशिरापर्यंत वडगाव मावळ पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत होते.

आरोपी प्रियकराची दुचाकी इंद्रायणी नदीकाठी मिळाली असून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-