‘या’ शेअरमध्ये एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 2.65 कोटी, वाचा सविस्तर माहिती

नवी दिल्ली | बीपीसीएलच्या (BPCL) एका शेअरची किंमत एनएसईवर (NSE) 331.80 रुपये होती. या शेअरच्या मालक कंपनीने तिच्या ग्राहकांना चार वेळा बोनस शेअर दिला. त्यामुळे या शेअरच्या मालकांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

रुपये एक लाख असणाऱ्या या शेअर्सची किंमत आज 2,65,45,327 झाली आहे. त्यामुळे या शेअरच्या धारकांना लॉटरीच लागली आहे. तुम्ही देखील अशा प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती, तर आज करोडपती झाला असता.

शेअर मार्केट हा झुगार नाही आहे. योग्य अभ्यासपूर्ण गुंतवणूक आपल्याला नेहमी फायद्यात ठेऊ शकते. कमी काळाची गुंतवणूक (Short Term Investment) करण्यापेक्षा जास्त काळ गुंतवणूक (Long Term Investment) करणे नेहमीच फायदेशीर असते.

दिर्घकालीन (Long Term Investment) गुंतवणुकीत कंपनीकडून बोनस शेअर्स मिळण्याची देखील शक्यता असते. आपण माहिती घेत आहोत तो शेअर आहे, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Limited).

या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांचे एक लाख रुपये 23 वर्षांनी 2.65 कोटी झाले आहेत. कंपनीने नेहमी दिलेल्या बोनस शेअर्समुळे ग्राहकांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

डिसेंबर 2000, जुलै 2012, जुलै 2016 आणि जुलै 2017 या चार वेळी बीपीसीएलने त्यांच्या ग्राहकांना बोनस शेअर्स (Bonus Shares) दिले आहेत. पहिल्या तीन वर्षात कंपनीने 1:1 या रेशिओप्रमाणे शेअर्स वाटले आणि शेवटच्या टप्प्यात 1:2 बोनस शेअर्स दिले.

जर का आपण 2000 साली बीपीसीएलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती, तर आज 22 वर्षांनी त्या लाखाचे 2.65 कोटी रुपये झाले असते. त्यावेळी या एका शेअर्सची किंमत रुपये 15 होती.

शनिवारी बीपीसीएलच्या एका शेअर्सची किंमत 331.80 रुपये होती. त्यामुळे आतापर्यंत या स्टाॅकमध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना एक लाखाचे 2.65 कोटी मिळाले असते.

महत्वाच्या बातम्या – 

75 वर्षात कसा बदलला भारतीय नौदलाचा ध्वज, जाणून घ्या सविस्तर माहिती

पुण्यात आता उडत्या बस!, Nitin Gadkari यांनी सांगितली भन्नाट योजना

INS Vikrant बद्दल ‘या’ 10 गोष्टी प्रत्येक भारतीयाला माहितच हव्यात, अभिमान वाटेल!

“2002 लोकसभा निवडणुकीपूर्वी संघाचा देशात बॉम्बस्फोट करण्याचा कट होता”; माजी प्रचारप्रमुखाचा मोठा दावा

“मनीष सिसोदियांना अटक केली, तर आम्ही गुजरातमध्ये…” अरविंद केजरीवाल यांचा दावा