भोपाळ | राजकीय नेते आपल्या अजब गजब वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असतात. आताही मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या नेत्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करत मोठा वाद निर्माण केला आहे.
मध्य प्रदेश भाजपचे प्रभारी पी मुरलीधर राव यांनी ब्राम्हण आणि बनिया या समाजाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. परिणामी सध्या त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.
बनिया आणि ब्राम्हण हे समाज तर माझ्या खिशात आहेत, असं पी मुरलीधर राव म्हणाले आहेत. नागरिकांशी संवाद साधताना त्यांची जीभ घसरल्याचं बोलंल जात आहे.
मध्य प्रदेशमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी मुरलीधर राव हे निघाले होते. अशातच त्यांनी विविध विषयांवर आपली मत मांडताना हे वक्तव्य केलं आहे.
नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास यावर भाष्य करताना मुरलीधर यांनी भाजप सर्वांचा विकास करणार असल्याचं म्हटलं आहे. मुरलीधरन हे भाजपचे लोकप्रिय नेते आहेत.
आम्ही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालत आहोत. कोणत्याही एका विशिष्ट जाती आणि धर्माचा विकास करणं हे आमचं लक्ष्य नसल्याचंही मुरलीधरन म्हणाले आहेत.
बनिया आणि ब्राम्हण या दोन्ही समाजांना आम्ही आधिपासूनच आपलं मानतो. हे दोन्ही समाज आमच्या कायम सोबत आहेत, असंही मुरलीधरन म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वी मुरलीधर यांनी असचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मुरलीधरन यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना नालायक म्हटलं होतं. परिणामी त्यांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होेतं.
मध्य प्रदेश भाजपचे प्रभारी असणारे मुरलीधर राव हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पण त्यांच्या या वक्तव्यानं मध्य प्रदेशमध्ये जोरदार वाद पेटला आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश काॅंग्रेसनं मुरलीधर यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. परिणामी सध्या मध्य प्रदेशमध्ये जोरदार राजकीय वाद पेटला आहे. ब्राम्हण आणि बनिया समाजाचा अपमान केल्याबद्दल मुरलीधर यांच्याबद्दल तीव्र असंतोष आहे.
महत्त्वाच्या बातम्या
“हायड्रोजन सोडा, मलिकांना आता ऑक्सिजनची गरज पडेल”
‘बिग बाॅस 15’: अभिनेता राकेश बापट रुग्णालयात दाखल
मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी
आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर