वक्तव्य मागे घ्या, अन्यथा… ब्राह्मण महासंघाचा सुजय डहाकेला इशारा

मुंबई |  आघाडीच्या टीव्ही मालिकांमध्ये ब्राह्मण समाजाच्या अभिनेत्री सोडून इतर समाजाताली अभिनेत्री का नाहीत? आपल्या मराठी इंडस्ट्रीला जातीयवादाने पोखरून काढलंय. पण बाहेरून ती चांगली आहे, असं दिसतं, असं परखड मत दिग्दर्शक सुजय डहाकेने एका मुलाखतीत मांडलं आहे. त्यावरून आता वादाला सुरूवात झाली आहे. मराठी कलाकार आता सुजयविरोधात पोस्ट लिहून त्याच्या वक्तव्याचा निषेध करू लागले आहेत. ब्राह्मण महासंघाने देखील सुजय डहाकेला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

सुजय डहाके यांचं वक्तव्य हे निव्वळ मुर्खपणाचं आहे. मनोरंजन क्षेत्रात जातीयवाद पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं अन्यथा त्यांच्या एखाद्या चित्रपटावर काय कारवाई करायची त्याचा निर्णय घेतला जाईल, असं ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी सांगितलं आहे.

ब्राह्मण कलाकारांबद्दल जे वक्तव्य केलंय त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. निव्वळ मूर्खपणाचं हे विधान आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये जातीयता पसरवण्याचे हे उद्योग आहेत. प्रसिद्धीसाठी सुजय डहाकेने हे विधान केलेलं आहे, असं आमचं स्पष्ट म्हणणं असल्याचं दवे म्हणाले आहेत.

दुसरीकडे, सुजयच्या विरोधात आज शशांक केतकर, तेजश्री प्रधान, सौरभ गोखले यांनीही उघड विरोधी भूमिका घेत त्याचा जोरदार समाचार घेणाऱ्या पोस्ट लिहिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-सुजय डहाकेला कानफडण्याची सौरभ गोखलेची भाषा; काढली थेट लायकी!

-अण्णा हजारे यांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; पत्रात म्हणतात…

-दाभोळकर हत्याप्रकरणातील ‘हा’ मोठा पुरावा सापडला सीबीआयच्या हाती!

-…म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या 7 खासदारांना केलं निलंबित!

-इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघ पोहोचला अंतिम फेरीत!