Top news देश

Breaking: ‘बिकानेर एक्सप्रेस’चा मोठा अपघात, 12 डब्बे रूळावरून घसरले

bikaner e1642078957471
Photo Credit - Twitter/@poornima_mishra

कोलकाता | पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी भागातील मैंगुडी येथे बिकानेर एक्सप्रेस रुळावरून घसरून मोठा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती देखील मिळाली आहे. ही ट्रेन बिकानेरहून गुवाहाटीला जात होती.

मैनागुरी ओलांडत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

ट्रेनचे 12 डब्बे रुळावरून घसरले आहेत. बिकानेरहून गुवाहाटीला जात असताना हा अपघात झाला आहे.

माहिती मिळताच रेल्वे पोलिस प्रशासनासह जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि मदतकार्यास सुरूवात केली आहे.

दहा जणांना रेल्वेच्या बोगीतून बाहेर काढल्यानंतर स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

ही घटना गुरुवारी सायंकाळी 5:15 च्या सुमारास घडली. ट्रेनचे 12 बोगी रुळावरून घसरले असून प्रवाशांनी भरलेले 4 डब्बे पूर्णपणे उलटले आहेत.

दरम्यान, जखमी प्रवाशांवर उपचार करण्यासाठी 30 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या असून सिलीगुडीहून एक रिलीफ ट्रेन पाठवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या – 

“राजसाहेब मानलं तुमच्या दुरदृष्टीला, बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण झालं”

 5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग

श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…