मुंबई | मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये कोरोनाने थैमान घातल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळे आता बाॅलिवूडसह अनेक क्षेत्रातील नामविख्यात व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचं पहायला मिळतंय.
अशातच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे जास्त वय असल्याने त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आलं.
मुंबईतील ब्रीड कँडी रूग्णालयात त्यांवर उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर लतादीदी आयसीयूमध्ये होत्या. त्यांची प्रकृती नाजूक होती.
त्यामुळे लतादीदींसाठी सर्वजण प्रार्थना करत होते. अशातच आता लतादीदींच्या प्रकृतीबाबात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
लता मंगेशकर यांच्यावर सध्या उपचार सुरू असले तरी त्यांची प्रकृती सुधारत असून लवकरच डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.
देवाची कृपा आहे. लतादीदी लढवय्या आहेत. आपण त्यांना इतकी वर्षे ओळखत आहोत. त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळं त्यांची तब्येत सुधारत असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे.
लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर देण्यात आला होता.
दरम्यान, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांचे चाहते देखील आनंद व्यक्त करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
एका आयटम साॅंगसाठी नोरा घेते तब्बल ‘इतकं’ मानधन; आकडा ऐकून व्हाल थक्क
सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा; ‘या’ कारणामुळे सोडणार टेनिसचं कोर्ट
अखेर डुग्गू सापडला! बेपत्ता स्वर्णव सापडल्यानं आई-वडिल भावूक
रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी
नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने…