वेस्ट इंडिजविरूद्ध भारतीय संघ जाहीर, ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी

मुंबई | भारतीय क्रिकेट संघ फेब्रुवारीच्या सुरूवातील वेस्ट इंडिज सोबत द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. परिणामी त्या दृष्टीनं संघामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न बीसीसीआयकडून करण्यात आला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान 3 वनडे आणि 3 टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे. परिणामी या मालिकेतील यशावर खूप काही अवलंबून असणार आहे. कारण आत्ताच भारतानं दक्षिण आफ्रिकेत मालिका गमावल्या आहेत.

आता रोहितनं आपली फिटनेस टेस्ट यशस्वीपणे पुर्ण केली आहे. परिणामी त्याच्या नेतृत्वात भारताला या मालिकेत विजयाची अपेक्षा आहे. म्हणून भारत विजयाच्या ध्येयाने मैदानात उतरणार आहे.

अशातच आता निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे आणि टी-20 मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाची निवड केली आहे. वनडे आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय संघ खेळणार आहे.

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), डी चहर, शार्दुल ठाकूर, चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर , रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, असा वनडेसाठी संघ असणार आहे.

तर रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, आवेश खान, हर्षल पटेल, अशी टी-ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय टीम असेल.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमीला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुल दुसऱ्या वनडेपासून उपलब्ध असेल. अक्षर पटेल T20I साठी उपलब्ध असेल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.

गुडघ्याच्या दुखापतीनंतर आर जडेजा तंदुरुस्तीच्या अंतिम टप्प्यातून जात आहे आणि तो एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाही, अशी माहिती देखील मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Bigg Boss 15 Grand Finale: दीपिका आणि सलमानचा अनोखा अंदाज, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! मुंबईत पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

“मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घ्यावा नाहीतर…”; गोपीचंद पडळकरांचा सरकारला थेट इशारा

“मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष नामर्द”, संजय राऊतांचा हल्लाबोल

भारतात फिरू नका, बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत- जो बायडन