Top news खेळ

विराटला नेमकं म्हणायचंय काय? कर्णधारपदाचा राजीनामा देत म्हणाला…

virat e1642258758370
Photo Credit - Twitter/ ICC

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या विराट कोहलीने एकामागून एक क्रिकेटच्या तिन्ही फाॅर्मटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आलं आहे.

विराट कोहली भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने आपला निर्णय जाहीर केला.

एक पोस्ट शेअर करत विराटने ही माहिती दिली आहे. त्याच्या या निर्णयाचं बीसीसीआयने देखील स्वागत केलं आहे. मात्र, विराटच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे आणि भारताचा कसोटी कर्णधार म्हणून माझ्यासाठी ते आता आहे, असं कोहली म्हणाला आहे.

मी जे काही करतो त्यामध्ये माझे 120 टक्के देण्यावर माझा नेहमीच विश्वास आहे. माझ्या मनात पूर्ण स्पष्टता आहे आणि मी माझ्या संघाशी अप्रामाणिक असू शकत नाही, असंही कोहली म्हणाला.

“मी माझ्या संघाशी अप्रामाणिक असू शकत नाही”, असं कोहली म्हणाल्याने आता चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे कोहलीला नक्की म्हणायचंय काय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

काही दिवसांपासून बीसीसीआय आणि विराट कोहली यांच्यातील वाद सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आता विराटचा निर्णय बीसीसीआयच्या दबावाखाली तर नाही ना?, अशी चर्चा देखील क्रिडा विश्वात होताना दिसत आहे.

दरम्यान, एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदावर वाद झाल्यानंतर विराटने घेतलेल्या पत्रकार परिषदेत चांगलाच वाद झाल्याचं पहायला मिळालं होतं. आता हा वाद आणखी पेटणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Rain Alert! विदर्भासह राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

कोरोनाला दूर ठेवायचंय! व्यायामाचे ‘हे’ 5 प्रकार घरच्या घरी करा

“…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

 ‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया

  महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार