मुंबई| ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा बर्याचदा चर्चेत असते. कृष्णा श्रॉफ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लव्ह लाईफबद्दल बरेच फोटो शेअर करताना दिसते. कृष्णाची लव्ह लाइफ अगदी खुली झाली आहे. ती बहुतेक वेळा तिच्या प्रियकराबरोबर वेळ घालवताना दिसली आहे. मात्र, आता तीने तिच्या लव्ह लाईफबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकली तर तिचे अनेक बो.ल्ड फोटो आपल्याला पहायला मिळतात. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाले होते. काही दिवसांपूर्वी कृष्णाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा बॉयफ्रेंड एबन हेम्ससोबतचे किस करतानाचे फोटो शेअर केले होते.
कृष्णा आणि एबनचे हे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. पण आता ते दोघे एकत्र नसल्याचं कृष्णा श्राॅफने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहीलं आहे. तुम्ही सर्व फॅन क्लब भारी आहात परंतु मला एबन हायम्ससह टॅग करणे थांबवा. मला एबनसोबत एडिट केलेल्या फोटोत टॅग करणं बंद करा, असं कृष्णाने म्हटलं आहे.
कृष्णाने त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं आहे. तीने त्यांचे दोघांचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट देखील केले आहेत. कृष्णा आणि एबन हायम्स एकमेकांना वर्षभरापासून डेट करत होते.
या वर्षाच्या सुरूवातीला दोघांनी डेटिंग अॅनिव्हर्सरीही साजरा केली. त्यांच्या नात्याची विण अधिक घट्ट होत आहे असं वाटत असतानाच कृष्णानं ब्रेकअपची माहिती दिल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दोन वर्षापुर्वी या दोघांचे रोमॅंटिक फोटो व्हायरल झाले होते. पण आता त्यांनी वेगवेगळे मार्ग निवडल्याच समजतंय. लाॅकडाऊनमध्ये पण हे दोघं एकत्र होते. मात्र, आता त्यांच्या चाहत्यांना त्यांची जोडी कधीच पहायला मिळणार नाही. कृष्णा श्राॅफ तिच्या भावा सारखीच दबंग दिसते. पण कृष्णा पडद्यावर काम करण्यापैक्षा पडद्यामाघे राहणं पसंत करते.
विशेष म्हणजे एबन बास्केटबॉल खेळाडू आहे. एबन आणि कृष्णा एका रेस्टॉरंटमध्ये भेटले. तेव्हापासून दोघेही एकमेकांसोबत होते. दोघांनी बराच वेळ एकमेकांना डेट केले. कृष्णाने अनेकदा दोघांचे रोमँटिक फोटो देखील शेअर केले.
कृष्णाच्या चाहत्यांनी एकदा तिला सोशल मीडियावर विचारले की, तुम्हा दोघांचे लग्न कधी होईल? तेव्हा ती म्हणाला की, लवकरच होईन. मात्र, आता या दोघांच्या नात्यात दरार आल्याचं स्पष्ट झालं आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या-
सुशांतच्या मृ.त्युनंतर देखील अंकिताने केलं ‘ते’ कृत्य, सोशल मीडियावर झाली प्रचंड ट्रोल
धक्कादायक! पतीच्या मृ.त्युनंतर ‘या’ गावात पत्नीच्या शरीराचा हा भाग का.पला जातो
भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता! शिवसेना नेत्यांचा ‘तो’ दावा खोटा?
अमिताभ यांनी ‘ते’ अ.श्लील कृत्य केलं अन् मग अमृताने त्यांच्या कानाखाली वाजवली; वाचा सविस्तर
‘माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही’; नितीश कुमारांचा मोठा खुलासा, मग बिहारचे मुख्यमंत्री कोण?