नवी दिल्ली | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला आहे. हा दौरा रद्द करण्याबाबत ठाकरे यांनी सापळा रचल्याची माहिती मिळाली, तसेच त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं.
हा दौरा रद्द करण्यामागे भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचाही हात असल्याचं मानलं जात असून, ते राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी सातत्याने करत आहेत. त्यांनी आता पुन्हा एकदा राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे.
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतरही भाजप खासदार गप्प बसले नाहीत, ठाकरे यांची कधीतरी भेट झाली तर नक्कीच दोन हात करू, असे ते म्हणाले.
आता राज ठाकरे यांचं मन बदललं असून त्यांना अयोध्येत यायचं आहे. मात्र जोपर्यंत ते उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिलाय.
राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते, पण नंतर त्यांनी आपला दौरा रद्द केल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतरही बृजभूषण सातत्याने राज ठाकरेंना विरोध करत आहेत.
राज ठाकरे ज्या कोणत्या उत्तर भारतीय राज्यात जातील, तिथे त्यांना विरोध केला जाईल. माफी मागितल्याशिवाय त्यांना प्रवेश नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.
महत्त्वाच्या बातम्या-
“6 व्या जागेची उद्या शिट्टी वाजेल, आम्ही निरोपाची वाट बघत नाही”
“…म्हणून या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार”
‘तोपर्यंत आम्ही झोपणार नाही आणि झोपूही देणार नाही’; फडणवीस कडाडले
‘दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनता येणार नाही’, शिवसेनेची बोचरी टीका
‘अमरावतीची भाकरवडी’ म्हणत दीपाली संय्यद यांचा नवनीत राणांवर घणाघात, म्हणाल्या…