“शरद पवार मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आक्रमकपणे विरोध केला.

राज ठाकरेंनी तब्येतीच्या कारणांमुळे दौरा रद्द झाल्याचं सांगितलं. तसेच पुण्यात झालेल्या सभेत बोलताना राज यांनी माझा अयोध्या दौरा रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्रातूनच रसद पुरवली जात होती, असा आरोप केला.

राज ठाकरेंनी कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेणं टाळलं होतं. आता मात्र मनसेने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडे बोट दाखवलं आहे.

मनसेच्या नेत्यांनी बृजभूषण सिंह यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांचा दौरा रद्द होण्यामागे राष्ट्रवादीचाच हात असल्याचा आरोप केला आहे. मनसेने केलेल्या आरोपांवर आता बृजभूषण सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवार हे देशातील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडून काही गोष्टी शिकाव्यात, असा सल्लाही बृजभूषण सिंह यांनी दिला.

जभूषण सिंह यांनी शरद पवार यांच्यासोबत आपले संबंध असल्याची जाहीर कबुली दिली. आजही आमचे संबंध आहेत. मला त्यांना भेटायचे असेल तर आम्ही लपुनछपून भेटणार नाही. ते मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?” 

“तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती”

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“…म्हणून या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार”

‘तोपर्यंत आम्ही झोपणार नाही आणि झोपूही देणार नाही’; फडणवीस कडाडले