व्लादिमिर पुतीनबाबत ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा जगाला हादरवणारा दावा!

लंडन | ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. यामुळे जगभरात खळबळ माजली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांचं गंभीर आजारानं आधीच मृत्यू झाला असल्याचा दावा MI6 च्या प्रमुखांनी केला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. त्याच काळात गेल्या काही दिवसांपासून पुतीन यांची तब्येतही बिघडल्याचं म्हटलं जात आहे.

पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो, असा दावा ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी केला आहे.

व्लादिमिर पुतीन यांचा मृत्यू झाल्याची बातमी बाहेर आली तर एकच खळबळ उडण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच त्यांच्यासारखाच दिसणारा, देहबोली असणाऱ्या व्यक्तीकडून राज्यकारभार चालवला जात आहे, असंही गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी सांगितलं आहे.

ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळानं द डेली स्टारच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. या दाव्याने जगभरात खळबळ उडालीये.

महत्त्वाच्या बातम्या-  

‘घटनेच्या तीन तासांनंतर…’; अखेर सिद्धू मूसेवालाच्या हत्येचं कारण आलं समोर 

“राष्ट्रवादी हा शेजारच्या घरी पाळणा हलला की पेढे वाटणारा पक्ष” 

“पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार”

मोठी बातमी | भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर 

  मोठी बातमी ! प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसे वाला यांची हत्या