‘मिडल फिंगर’ दाखवणं पडलं महागात; मिळाली ‘ही’ शिक्षा

नवी दिल्ली : आपल्या भावाच्या पत्नीला ‘मधलं बोट’ दाखवणं दिल्लीतील दीराला चांगलंच महागात पडलं आहे. अश्लील हावभाव करत ‘मधलं बोट’ दाखवल्याच्या आरोपातून दिल्ली कोर्टाने आरोपी तरुणाला तीन वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावला आहे.

महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तरुणाने अश्लील हावभाव करुन ‘मधलं बोट’ दाखवल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. तीन वर्षांच्या तुरुंगवासासोबतच तरुणाला कोर्टाने दंडही ठोठावला आहे. महानगर दंडाधिकारी वसुंधरा आझाद यांनी निकाल सुनावला आहे.

पाश्चिमात्य पद्धतीनुसार ‘मधलं बोट’ अर्थात ‘मिडल फिंगर’ दाखवणं हे असंस्कृतपणाचं लक्षण मानलं जातं.

21 मे 2014 रोजी पीडित वहिनीने आरोपीविरोधात तक्रार केली होती. दीराने अश्लील हावभाव करत ‘मधलं बोट’ दाखवलं आणि आक्षेपार्ह भाष्य केलं, असा दावा पीडित महिलेने तक्रारीत केला होता.

दरम्यान, आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही महिलेने केला होता. तपासानंतर पोलिसांनी कलम 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या-