भाऊ कदम कसे करतात स्क्रिप्टचे पाठांतर?, पाहा व्हिडीओ

मुंबई |  सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.  अनेक अभिनेते-अभिनेत्री आपले व्हिडीओ शेअर करत असतात. आपल्या सगळ्यांना चला हवा येऊद्या हा मराठी कार्यक्रम सर्वांचा लोकप्रिय झाला आहे.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील कलाकारांनी महाराष्ट्रातील सर्वांच्या मनात एक  स्थान निर्माण केलं आहे.  त्यामधील भाऊ कदम तर लहानांपासून ते अगदी वृद्धापर्यंत सगळ्यांचा आवडता आहे. त्याची सगळेचजण टिंगल, मस्करी करत असतात.

कार्यक्रमाच्या शूटींगवेळी अनेकजण एकमेकांची मस्करी करताना आपण पाहतो. अभनय करत असतात. सगळे कधीतरी आपलं वाक्य विसरात. यामध्ये भाऊ कदम यांचं नाव पहिलं घेतलं आज. भाऊ कदम आपल्या वाट्याला दिलेल्या पात्राला जे डायलॉग असतात, त्याचं ते कधीच पाठांतर झालेलं नसतं.

तर अशातच भाऊ कदम यांचा ते कशा पद्धतीने स्क्रिप्ट पाठ करतात याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये भाऊ कदम यांच्या हातात स्क्रिप्ट असल्याचं दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी ती स्क्रिप्ट हातात धरली असून ते झोपी गेली असल्याचंही व्हायरल व्हि़डीओमध्ये दिसतं आहे.

हा व्हिडीओ अभिनेता कुशल बद्रीके यांनी आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. तो त्या व्हिडीओमध्ये भाऊ कदमला विचारतो आहे की तू काय करत आहेस?, तर भाऊ अचानक डचकून उठतो आणि उत्तर देतो की मी स्क्रिप्ट वाचतो आहे. व्हिडीओ पोस्ट करताना ‘भाऊ कदम याचं पाठांतर चालू आहे, सगळ्यांनी शांत रहा.’ असं कॅप्शन कुशल बद्रीके यानी लिहिलं आहे.

हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरहोत असून, या व्हिडीओला इंस्टाग्रामवर जवळपास 27 हजार लाईक्स आले आहेत. त्याचप्रमाणे या व्हिडीओला लोकांनी वेगवेगळ्या कमेंटही दिल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वी भाऊ कदम आपल्याला ‘व्हीआयपी गाढव’ या सिनेमातून नव्या नव्या रंगात अन् नव्या ढंगात पाहायला मिळाला होता. या चित्रपटामध्ये भाऊ कदम मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला होता.


महत्वाच्या बातम्या-

देसी जुगाड वापरत ‘या’ काकांनी ब्लेडशिवाय केली…

सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला राखी सावंतने सुनावले असे…

‘ए जानू चल झाडू मार’; शिल्पा आणि राजचा हा…

श्रद्धा कपूरच्या घरात अचानक शिरला गोलिरा अन…;, पाहा…

अभिनेत्री प्राची देसाईनं लग्नाबद्दल केला खुलासा,…

 

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy