पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचच मोदी सरकारविरोधात आंदोलन

नवी दिल्ली | दिल्लीत सध्या पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु आहे. त्यात विरोधक सत्ताधारी भाजपला महागाई, इंधनवाढ आणि रुपयाचे घसरलेले मूल्य यावरुन धारेवर धरत आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे बंधू यांनी जंतर मंतर मैदानावर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) हे रेशन डिलर्स असोशिएसनचे (Ration Dealers Association) अध्यक्ष आहेत. तसेच ते ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेड्रेशनचे (All India Fare Price Shop Dealers Federation) उपाध्यक्ष देखील आहेत. त्यांनी काल (दि. 02) रोजी रेशन डिलर्स असोशिएसनसोबत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

यावेळी त्यांच्या समवेत ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेड्रेशनचे इतर सदस्यदेखील उपस्थित होते. फेड्रेशनचे एक प्रतिनिधीमंडळ त्यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मागण्या एकत्र करुन पंतप्रधानांना एक निवेदन देणार आहेत.

कॉस्ट ऑफ लिव्हींगमध्ये झालेले वाढ आणि दुकाने चालविण्यासाठी वाढलेला खर्च आणि अशा परिस्थितीत केवळ किलोमागे 20 पैशांची वाढ हे त्यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारला जाब विचारला आहे.

आज बुधवारी (दि. 03) फेड्रेशनची एक बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील दिशा ठरविली जाणार आहे. माझा भाऊ पंतप्रधान आहे, तर मग मी काय उपाशी मरायचे का? असा प्रश्न प्रल्हाद मोदी यांनी विचारला आहे.

फेड्रेशनचे एक शिष्टमंडळ लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांची भेट घेणार असल्याची माहिती फेड्रेशनचे सरचिटणीस विश्र्वंबर बसू (Vishwanbar Basu) यांनी दिली. याचबरोबर गहू, साखर आणि तांदूळ यांच्या झालेल्या नुकसानीबरोबर रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून पुरवठा करण्यात येणाऱ्या खाद्यतेल आणि डाळींसाठी शिष्टमंडळ नुकसानभरपाईची मागणी करणार आहे.

यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांकडे मोफत धान्य वाटपाचे ‘पश्चिम बंगाल रेशन मॉडेल’ संपूर्ण देशात लागू करण्यात यावे अशा स्वरुपाची मागणी देखील बसू यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

“कोरोना लसीकरण मोहीम संपल्यावर लगेच CAA लागू करणार…”

अजित पवारांनी उडवली शिंदे सरकारची खिल्ली, म्हणाले…

टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल; आता ‘हे’ नाव देणार

‘त्या निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये’; शिंदेंची न्यायालयाला विनंती

नाशिकच्या मासिक पाळी प्रकरणाला नवं वळण, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर