मुंबई | भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. उत्तर भारतीयांचे वंशज भगवान श्रीरामाचा महाराष्ट्रात अपमान झाला आहे.
राज ठाकरे अपराधी आहेत, असं खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी. माफी मागितल्याशिवाय अयोद्धेत आले तर राज ठाकरे यांचा आम्ही उत्तर भारतीय विरोध करणार, असा देखील इशारा खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
खासदाप बृजभूषण सिंह यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार हे मोठ्या मनाचा माणूस आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 5 वेळा माफी मागितली असती, असे म्हणत सिंह यांनी राज ठाकरेंना टोलाही लगावला आहे.
सुप्रिया सुळे यांचे स्नेहाचे संबंध असल्याचंही त्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे या संसदेत बाकावर आमच्यासाठी खायला पदार्थ घेऊन येतात, असंही ते म्हणालेत.
मी मराठी लोकांच्या किंवा महाराष्ट्राच्या विरोधात नसून केवळ एका व्यक्तीच्या विरोधात आहे. त्यामुळे, त्या व्यक्तीने उत्तर प्रदेशची माफी मागावी, किंवा येथील संतांची माफी मागावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“माझी उंची मोठी म्हणून मी हवेत, जास्त टीका करू नका नायतर…”
मोठी बातमी! महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर
“आणखी दोन वर्ष आम्ही गुण्यागोविंदाने पार करू, 2024 मध्ये परत एकदा निवडून येऊ”
संभाजीराजेंनी उचललं मोठं पाऊल, पत्रकार परिषद घेत केली ‘ही’ घोषणा
उत्तर कोरियात कोरोनाचे दोन रूग्ण आढळताच किम जोंगची मोठी घोषणा!