मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील आठड्याच्या सुरूवातीला लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना काळात आलेल्या या अर्थसंकल्पाकडे सर्व लोक अपेक्षेने पाहत आहेत. लोकसभेच्या सर्व सदस्यांना बजेटची डिजिटल कॅापी दिली जाणार आहे.
कोरोनामुळे यंदाचे अर्थसंकल्प डिजिटल होणार आहे. यावेळी अर्थसंकल्पाच्या प्रती छापण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आजवर चालत आलेली अर्थसंकल्पापुर्वीची मोठी प्रथा बंद केली आहे.
कोरोना महामारीमुळे यावेळी हलवा सेरेमनी रद्द करून अधिकाऱ्यांना मिठाई वाटण्यात आली आहे. त्यामुळे आता मोदी सरकारवर टीका देखील होताना दिसत आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पातून देशी व्यवसायिक मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. करमर्यादा 5 किंवा साडे पाच लाख करावे आणि त्या करांमध्ये वाढ होऊ नये, अशा अनेक अपेक्षा केल्या जात आहेत.
प्रत्येक वेळी बजेट ठरवण्याआधी हलवा बनवत एका प्रकारच्या उत्सवाप्रमाने साजरा केला जातो. मात्र, आता मोदी सरकारने ही परंपरा मोडीत काढली आहे.
अर्थसंकल्प तयार करणारे अधिकारी आणि कर्मचारी हे मंत्रालयाच्या बेसमेंटमध्ये बंद केले जातात. लोकसभेमध्ये अर्थसंकल्पाचे बजेट सादर झाल्या नंतर बाहेर पडता येते. या कर्मचार्यांना बंद करण्याआधी हलवा सेरेमनी करण्याची प्रथा आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यापूर्वीपासून चालत आलेली ही प्रथा आता बदलत चालल्याचं पहायला मिळत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून करमर्यादा कमी करण्याचीही अपेक्षा आहे.
यंदाचा अर्थसंकल्पात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“सरकार ड्राय डे ला सुपर मार्केट आणि किराणा दुकान बंद ठेवणार का?”
अखेर समंथा नागा चैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने सोडलं मौन, म्हणाला “समंथाला…”
महाराष्ट्राच्या चित्ररथावरून वाद, सोशल मीडियावर नाराजीचा सूर
पदोन्नती आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
12 आमदारांचं निलंबन रद्द! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…