भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती

ठाणे | भिवंडीच्या शांतीनगर परिसरात शुक्रवारी रात्री चार मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. तसेच ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शांतीनगर भागातील चार मजली इमारतीचा कॉलम शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हलू लागल्यामुळे रहिवाशांमध्ये भितीच वातावरण होतं. इमारतीला तडे गेल्यानंतर रहिवाशांची सुटका करतानाच ही इमारत पडली.

कोसळलेली ही इमारत केवळ सहा वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत 28 वर्षीय शिराज अन्सारी आणि आकिब या दोघांचा मृत्यू झाला.

दरम्यान,चौघांना जिवंत बाहेर काढण्यात आलं असून जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशामक दलाचे जवान, एनडीआरएफ टीम घटनास्थळी बचावकार्य करत आहे.

महत्वाच्या बातम्या-