संजना गणेशनसोबत लग्नाची चर्चा सुरू असताना व्हायरल होतोय बुमराहचा ‘हा’ व्हिडीओ! पाहा व्हिडीओ

मुंबई| भारतीय क्रिकेट संघातील मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच लग्नाच्या बेडित अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बुमराहच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. वैयक्तिक कारणामुळे बुमराहने काही दिवसांपूर्वी इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत आणि नंतर टी-20 मध्ये माघार घेतली. त्यामुळे आता तो टी-20 मॅचेसच्या सिरीजमध्ये खेळणार नाही.

बुमराह लवकरच बोहऱ्यावर चढणार असून ही सुट्टी त्याने लग्नासाठी घेतली, असं बीसीसीआयच्या आधिकाऱ्याने सांगितले. गोव्यात 14-15 मार्चला विवाह बंधणात अडकणार आहे. सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

बुमराह कोणाशी लग्न करणार? या बाबत सुरूवातीला सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. परंतु आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण तो संजना गणेशन या स्पोर्टस् अॅकरसोबत लग्न बंधणात अडकणार आहे. परंतु या दोघांकडून किंवा त्यांचा नातेवाईकांकडून अजूनही कोणता दुजोरा मिळाला नाहीये. या दोघांच्या लग्नाची चर्चा होत असताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात संजना बुमराहची मुलाखत घेत आहे. चाहत्यांनी या दोघांचा व्हिडिओ शेयर करत त्यांना लग्नाच्या शुभेच्छा द्यायलाही सुरूवात केली आहे.

संजना गणेशन ही क्रिडा अॅकर आहे. तिने क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन असे अनेक इव्हेंट होस्ट केले आहेत. संजनाने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड अॅकरिंग केलं आहे. तसेच ती कोलकत्ता नाईट रायर्डस या आयपीएल टीमसाठी अॉकरिंग करते. ती मॉडेलिंग क्षेञात असून 2014 मध्ये ती मिस इंडियाच्या फायनल पर्यंत पोहोचली होती. तिनं 2013 साली फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार पटकवला होता. स्पिल्टस् व्हिला या रियालिटी शो मधून तिनं टेलिव्हीजनवर पदार्पण केलं.

संजना मुळची पुण्याची असून सिंबायोसिस इंन्सिट्यूड मधून तिनं B.TECH चे शिक्षण पूर्ण केलं. त्यात तिने गोल्ड मेडल देखील पटकावलं. त्यानंतर 2013-14 सॉफ्टवेअर इंजिनीयरिंग केले. नंतर मॉडलिंग क्षेञात वळाली. संजनाने आत्तापर्यंत क्रिकेट संबंधित अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. या पूर्वी बऱ्याचदा क्रिकेट संबंधित कार्यक्रमांमध्ये त्या दोघांची सोबत भेट झाली. तसेच तिने या आधी एकदा बुमराहची मुलाखातही घेतली आहे.

दक्षिणात्य अभिनेञी अनुपमा परमेश्वरन हिच्या सोबत बुमराह लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच त्यांचाबद्दल अनेक बातम्या आल्या. परंतु या अफवा असल्याचं अनुपमाची आई सुनिता यांनी स्पष्ट केले. अशा अनेक नवनवीन चर्चा होत असतात. आम्ही त्या सकारत्मकतेने घेतो असं सुनिता यांनी म्हणलं आहे.

संजना आणि बुमराह विवाहबंधनात अडकणार आहे. परंतु त्यांचा नात्याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती माध्यमांसमोर आली नाही. दोघेही आपलं नातं सर्वापासून लपवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=Xax27qByVn8&t=7s

महत्वाच्या बातम्या-

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा आजचे दर