यंदाचं वरीस महागाईचं! दैनंदिन गरजेच्या ‘या’ वस्तू महागण्याची शक्यता

नवी दिल्ली | कोरोना (Corona) काळात अनेक संकटं आली. त्यामुळे सर्वांच्याच खिशाला कात्री बसल्याचं पहायला मिळालं. देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे ढासळली होती.

आता कोरोनाचं संकट पुन्हा डोकं वर काढू लागलं आहे. त्यामुळे आता महागाईचा भडका पुन्हा उडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

सध्या, वस्तूंच्या किंमती वाढण्याचा ट्रेंड आहे आणि अनेक तज्ज्ञांच्या मते महागाईचा दबाव आता कायम राहण्याची शक्यता आहे. घरातील किरानापासून लक्झरी कारपर्यंत सर्वच गोष्टी महागण्याची शक्यता आहे.

ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती 3 ते 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दुसरीकडे अंडी, ब्रेड, केक, बिस्किटे यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किंमतीत येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेड आणि बिस्किटांच्या किंमतीत वाढ होणार असल्याचं प्रसिद्ध कंपन्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता सामान्य माणसांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हर डवच्या किंमती 12%, Lux 10% आणि Surf Excel 20% ने वाढवणार आहे. त्याचबरोबर तेलाच्या किंमती वाढणार असल्याचं सांगण्यात येतंय.

देशातील बहुतांश कार कंपन्यांनी जानेवारीमध्ये त्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी महिन्यात किंमती वाढली होती.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये देशवासियांना केंद्र सरकारकडून मोठा आशा आहेत. कंपन्यांना कोरोना काळात झालेला तोटा भरून काढताना सामान्य माणूस भरडला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, त्यामुळे आता केंद्र सरकारने कठोर पाऊल उचणार शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार यंदा काय गिफ्ट देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख

5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग

श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…