मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून देशात गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना महागाईचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता ग्राहकांना कमी किंमतीमुळे गॅस खरेदी करण्याची संधी आहे.
सरकारी तेल कंपनी IOCL ने ग्राहकांसाठी ही योजना आणली आहे. ग्राहकांना 634 रूपयांमध्ये गॅस बुक करता येणार आहे. सदर सिलेंडर हा सर्वसाधारण कम्पोजिट सिलेंडर आहे. हा सिलेंडर 14 किलो सिलेंडरच्या तुलनेत वजनाने हलका आहे.
कम्पोजिट सिलेंडर हे वजनाने हलके आहेत. यामध्ये 10 किलो गॅस मिळतो. यामुळेच कम्पोजिट सिलेंडरची किंमत कमी आहे. हा गॅस सिलेंडर वजनाने हलका असल्यामुळे कोणीही एका हाताने देखील उचलू शकतो.
घरात वापरात असलेल्या सिलिंडरपेक्षा कम्पोजिट सिलेंडर 50 टक्के हलका आहे. या गॅस सिलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे हा पारदर्शी आहे. ट्रान्सपरेंट असल्याने गॅस किती शिल्लक आहे हे समजण्यास मदत होते.
हा गॅस सिलेंडर पुर्णपणे गंजरोधक आहे. लहान परिवारासाठी हा गॅस चांगला पर्याय देखील ठरू शकतो. तसेच या गॅस सिलेंडरचा कधीही स्फोट होऊ शकत नाही.
कम्पोजिट गॅस सिलेंडर हा तीन थरांनी बनवलेला आहे. सध्या वापरात असलेल्या रिकाम्या सिलेंडरचे वजन 17 किलो आहे. गॅसने भरल्यावर 31 किलोपेक्षा थोडी जास्त वजन भरते. या 10 किलोच्या कम्पोजिट सिलेंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस असणार आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. 1 मार्चपासून एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यातच आता ग्राहकांसाठी इंडियन ऑईल कार्पोरेशनने स्वस्त सिलिंडरची योजना आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे, घाबरण्याचा प्रश्नच येत नाही”
“देवेंद्र फडणवीसांनी एक व्हिडीओ बॉम्ब टाकला आहे आणि दुसरा व्हिडीओ बॉम्ब येत आहे”
“बाहेर पडलं की पाऊस अन् टिव्ही लावला की संजय राऊत”
“राष्ट्रवादीचे सर्वच नेते भ्रष्टाचाराने माखलेले, सगळे जेलमध्ये जाणार”
“काही लोक आता जेलमध्ये सकाळच्या पत्रकार परिषदेची परवानगी मागतील”