देश

आनंदाची बातमी! LPG सिलेंडर खरेदी करा फक्त 634 रुपयांना

lpg gas e1608980974737

नवी दिल्ली | एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे तुम्हीही हैराण असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही फक्त 633.5 रुपयांना एलपीजी सिलिंडर खरेदी करू शकता.

आम्ही नवीन संमिश्र गॅस सिलेंडरबद्दल बोलत आहोत. या नवीन मिश्रित LPG सिलेंडरचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही दिल्ली, बनारस, प्रयागराज, फरिदाबाद, गुरुग्राम, जयपूर, हैदराबाद, जालंधर, जमशेदपूर, पाटणा, म्हैसूर, लुधियाना, रायपूर, रांची, अहमदाबाद यांसारख्या शहरात राहत असाल तर तुम्ही ते 633.50 ते 697 रुपयांमध्ये रिफिल करू शकता. या सिलेंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस राहील.

संमिश्र सिलेंडर 14.2 किलो गॅससह मोठ्या सिलेंडरपेक्षा पारदर्शक आणि हलका आहे. त्याचे वजन कमी असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं सोपं आहे.

ज्या घरामध्ये गॅस कमी खर्चिक आहे त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. मिश्रित गॅस सिलेंडर दोन प्रकारांमध्ये येतो. यामध्ये 10 किलोचा आणि 5 किलोचा गॅस सिलिंडर आहे. 10 किलोच्या सिलिंडरसाठी ग्राहकांना 633.50 रुपये मोजावे लागतील.

5 किलो गॅससह मिश्रित एलपीजी सिलिंडर 502 रुपयांना रिफिल करावं लागेल. 10 किलोच्या सिलेंडरसाठी ग्राहकाला 3350 रुपयांची सुरक्षा द्यावी लागेल, तर 5 किलोच्या सिलेंडरसाठी 2150 रुपयांची सुरक्षा द्यावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

कोरोना व्हायरस कुठून आला?, शास्त्रज्ञांनी केला सर्वात मोठा खुलासा 

‘एकदोन नाही तर दीड डझन मंत्री…’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

‘या’ लोकांना Omicron चा सर्वात जास्त धोका ; WHO ने दिला गंभीर इशारा  

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती