दसऱ्याच्या मुहूर्तावर करा सोनं खरेदी, वाचा सोन्याचा आजचा दर

मुंबई | आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.

बहुतेक लोक आपला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवत असतात. तर काही सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात. तर आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये हल्ली चांगलीच मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

काल म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 290 रूपये होता. तर आच त्यामध्ये 680 रूपयाची वाढ झाली असून, आज 15 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 47 हजार 970 रूपये झाला आहे.

तसेच काल चांदीचा प्रति किलोचा भाव 62 हजार 100 रूपये होता. मात्र आज चांदी 1,100 रूपयांनी वाढली असून, आज चांदीचा प्रति किलोचा भाव 63 हजार 200 रूपये झाला असल्याचं समजतं आहे.

तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेटचा भाव प्रती तोळा सोन्याचा भाव हा 49 हजार 350 रूपये इतका असून, चांदीचा भाव प्रती किलो 63 हजार 200 इतका आहे.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदलेल्या मेंढरासारखी झाली आहे”

पेट्रोल-डिझेलच्या किंमती भिडल्या गगनाला, झाली ‘इतक्या’ रूपयांची वाढ

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

“…तर शिवसेनेचे 56 आमदार त्यावेळी तुमच्यासोबत दिसले असते”

“चित्रा वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत हे दाखवून दिलं”