महाराष्ट्र मुंबई

‘बीव्हीजी’चे मालक हणमंतराव गायकवाडांना 16 कोटी रुपयांना फसवलं

मुंबई : उद्योगजगतात नावलौकिक असणाऱ्या बीव्हीजी ग्रुपचे सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाडांची 16 कोटी 45 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी विनोद रामचंद्र जाधव आणि सुवर्णा विनोद जाधव या पती-पत्नीविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशातील मोठमोठ्या संस्थांना हाऊसकिपिंग सुविधा पुरवणाऱ्या बीव्हीजी कंपनीचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांची ओळख आहे, मात्र त्यांची फसवणूक झाल्याने एकच खळबळ उढाली आहे.

मार्च 2011 मध्ये बीव्हीजी प्रीमिअर प्लाझा हाऊस जुना मुंबई-पुणे रोड येथे हा प्रकार घडला आहे.

संशयित जाधव दाम्पत्य औषधांचा व्यवसाय करते. त्यांच्या 3 कंपन्या आहेत. त्यांचे मुख्य कार्यालय हे पुण्यातील विमाननगर येथे आहे. जाधव दाम्पत्यांने गायकवाड यांची भेट घेऊन संबंधित कंपन्या नफ्यात असल्याचे सांगत त्यांना आपल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक सांगितलं.

हणमंतराव गायकवाड आणि त्यांच्या पत्नी वैशाली यांनी जाधव दाम्पत्याच्या तिन्ही कंपन्यांमध्ये 16 कोटी 45 लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर तिन्ही कंपनीत 26 टक्के समभाग देण्याचे जाधव दाम्पत्यांनी मान्य केले होते, मात्र तसं झालं नाही आणि रक्कमही परत केली नाही, असं तक्रारीत म्हटलंय.

दरम्यान, जाधव दाम्पत्याने हणमंतराव गायकवाड यांना एका कंपनीच्या संचालकपदी नियुक्त केलं होतं, मात्र कंपनीच्या आर्थिक व्यवहारांपासून त्यांना अलिप्त ठेवण्यात आलं होतं. या कारणामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला राजीनामा दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस-राष्ट्रवादी मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर; हे 13 दिग्गज सेना-भाजपच्या वाटेवर

-…तर या दिवशी प्रकाश आंबेडकर, अजित पवार आणि राज ठाकरे एकाच मंचावर?

-हरितपट्ट्यात राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांचंच बेकायदा बांधकाम???

-भावाविरोधात कारवाई केल्याने मायावती भडकल्या; म्हणतात…

-वंचितची स्वबळावर लढण्याची तयारी; 30 जुलैला जाहीर करणार विधानसभेची पहिली यादी!

IMPIMP