Top news देश राजकारण

नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

nitin gadkari 1

नवी दिल्ली | भारत सरकार 2024 पर्यंत देशात 26 हरित महामार्गांचे (Green Highways) निर्माण करणार आहे. आणि त्यामुळे देशातील प्रमुख महानगरांमधील दळणवळण सुखकर आणि अल्पावधित होणार असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काल बुधवारी राज्यसभेत सांगितलं.

एकदा का हे महामार्ग तयार झाले की, देशातील वाहतुकीचा वेळ कमी होणार आहे. दिल्ली ते डेहराडून (Delhi to Dehradun) आणि हरिद्वार (Haridvar) आणि जयपूर (Jaypur) प्रवास दोन तासांनी कमी होणार असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.

गडकरी यांनी यावेळी काही वेळेची उदाहरणे देखील राज्यसभेतील आपल्या भाषणात दिली. दिल्ली ते चंदिगढ (Chandigarh) प्रवास अडीच तासात, दिल्ली ते अमृतसर (Amritsar) चार तास आणि दिल्ली ते मुंबई (Mumbai) प्रवास हा केवळ बारा तासांचा होणार असल्याचे गडकरी म्हणाले.

2024 पर्यंत भारतात अमेरिकेसारखे (United States of America) रस्ते आणि महामार्ग होणार असल्याचं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं. याचबरोबर परिवहन मंत्रालय नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या प्रयत्नात आहे.

टोल नाक्यांवर (Toll Plaza) रोख रकमेत आणि ऑनलाईन कर भरण्यामुळे रस्त्यांवर ट्राफिक जमा होते आणि त्यामुळे आम्ही येणाऱ्या काळात टोल नाक्यांवर कर गोळा करण्यासाठी नवीन अद्ययावत तंत्रज्ञान आणणार आहे, असे देखील गडकरी यांनी सांगितले.

सरकार टोल घेण्यासाटी दोन नवीन पद्धतींचा अवलंब करण्याच्या विचारात आहे. एक म्हणजे  सॅटेलाईट (Satellite) पद्धतीचा वापर आणि दुसरा पर्याय नंबर प्लेटचा. सॅटेलाईट पद्धचतीत जीपीएसच्या (GPS) माध्यमातून वाहन मालकाच्या बँक खात्यातून सरळ पैसे वर्ग केले जाऊ शकतात, असे गडकरी म्हणाले.

2019 सालापासून आम्ही नव्या आणि कॉम्प्युटराईज पद्धतीच्या वापरातून नंबर प्लेट वरुन गाडीचा टोल गोळा केला जाऊ शकतो, अशा प्रकारची नवीन प्रणाली आंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहोत.

महत्वाच्या बातम्या –

उर्फीने कपड्यांऐवजी गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ

मनसेचे शिंदे गटावर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

“त्या तीन पक्षांची स्थिती म्हणजे म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा”

‘दगड मारुन पळून जाण्यात मर्दुमकी नाही’, सामंतांवरील हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे संतापले